( रत्नागिरी /प्रतिनिधी )
लांजा तालुका बौध्दजन मंडळ मुंबई व ग्रामीण विभागातील पदाधिकऱ्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शनिवार (दिनांक 6 जानेवारी 2023) जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या मार्फत निवेदन देवून कारवाई करण्याची मागणी केली आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘X’ या सोशल मीडियावरून, हेवी ड्रायव्हर आप्पा या व्यक्तीने आपल्या ऑकांऊन्ट वरून भिमा कोरेगाव येथील विजयस्तंभाबाबत अत्यंत वाईट पोस्ट केली आहे. या पोस्टवरून संबंध बौद्ध बांधवांच्या भावना दुखावल्या आहेत. अशा घटनांमुळे राज्यातील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न होत आहे. पोस्ट करणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करून अटक करावी, या व्यक्तीने आपल्या प्रोफाईलमध्ये शिवजन्मभूमी जुन्नर, पुणे असा पत्ता दिला आहे.
सरकारकडून कारवाई न झाल्यास या घटनेचे राज्यभर पडसाद उमटण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्वरित आरोपीला अटक करावी तसे न झाल्यास सदर व्यक्ती आमच्या बौद्ध बांधवांच्या ताब्यात मिळाला व काही अनुचित प्रकार घडला तर याला सर्वस्वी महाराष्ट्र सरकार व गृहखाते जबाबदार असेल प्रशासनाने तात्काळ पावले उचलावीत व महाराष्ट्र शांत ठेवण्यासाठी संबधित व्यक्तीवर कठोर कारवाई करावी. असे निवेदनात म्हटले आहे.
यावेळी जिल्हा अधीक्षक यांना निवेदन देताना राष्ट्रीय काँग्रेसचे रत्नागिरी कार्याध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, ग्रामीण अध्यक्ष संतोष जाधव, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मीडिया फ्रंटचे जिल्हाध्यक्ष दाजी पितांबर गडहिरे, गौतम कांबळे, बामसेफचे बाळा कचरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
जिल्ह्यात उग्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा
राज्यांत अशा घटना वारंवार घडत आहे. या घटनांमुळे सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न होत आहे. प्रशासनाने आरोपीला तातडीने अटक करावी अन्यथा रत्नागिरी जिल्ह्यात उग्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल. असा इशारा अनिरुद्ध कांबळे यांनी दिला आहे.