(रत्नागिरी)
क्रांतीज्योती सावित्री बाई फुले यांनी मुलींना शिक्षण देण्यासाठी भारतातील पहिली शाळा सुरू केली. यामुळे महिला शिक्षणाला चालना मिळाली. त्यांनी महिलांच्या हक्कांसाठी अनेक चळवळी केल्या. यामुळे महिलांच्या हक्कांबाबत समाजात जागरूकता निर्माण झाली. महिलांच्या हक्कांसाठी लढलेल्या एक महान समाजसुधारक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९३ व्या जयंतीनिमित्त जाहीर व्याख्यानाचे आयोजन त्रिरत्न बौद्ध महासंघ रत्नागिरी यांच्या वतीने करण्यात आले आहे. या कार्यक्रमात सावित्रीबाई फुले यांनी दिलेल्या शिक्षणाचे पुन;मूल्यांकन या विषयावर मा. सिंधू भोगले मार्गदर्शन करणार आहे.
हा कार्यक्रम रविवारी ( दिनांक 7 जानेवारी 2024 रोजी ) सकाळी अकरा वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन, शिवाजीनगर येथे आयोजित करण्यात आले आहे. तरी या कार्यक्रमाला जास्तीत जास्तसंख्येने शिव, शाहू, फुले, आंबेडकर , संविधानवाद्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन त्रिरत्न बौद्ध महासंघाच्या आयोजकांनी केले आहे.