(रत्नागिरी)
शहराजवळील शिरगांव-शिवरेवाडी येथील प्रौढाने कोणत्यातरी अज्ञात कारणातून गळफास घेऊन आत्महत्या केली. शैलेश चंद्रकांत निवळकर (वय ४४, रा. शिरगाव-शिवरेवाडी, सुतारवाडी, ता. रत्नागिरी) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. ही घटना गुरुवारी (ता. ४) सकाळी नऊ च्या सुमारास सुतारवाडी येथे निदर्शनास आली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार शैलेशने बुधवारी रात्री जेवण झाल्यानंतर घरातील बेडरुमध्ये झोपला होता. सकाळी लवकर उठला नाही म्हणून पाहिले असता त्याने बेडरुममधील सिलींग फॅनला नायलॉनच्या दोरीने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात खबर देण्यात आली. खबरीवरुन पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.