दातदुखी ही आबालवृद्धांमध्ये आढळणारी अत्यंत त्रासदायक समस्या आहे. बर्याच जणांना दात किडल्यामुळे दातदुखीचा त्रास होतो . पण दात किडण्यासोबतच अन्य काही कारणांमुळे देखील दातदुखीची समस्या उद्भवू शकते.
दात कीडणे : दात कीडणे हे लक्षण जरी सामान्य असले तरीही दातदुखीचे एकमेव कारण नाही. दातांवर तयार होणार्या कॅव्हीटीज (छिद्र) यामुळे इनॅमलचे नुकसान होते व ते वेदनारहीत असते. मात्र ही छिद्र इनॅमलचा स्तर भेदून आतमध्ये प्रवेश करतात तेव्हा दात संवेदनशील (सेंसिटिव्ह) बनायला सुरूवात होते. यामुळे वेदना तीव्र होतात तसेच दातांच्या आजुबाजूला संसर्ग झाल्याने पू तयार होण्याची शक्यता असते.
हिरड्यांचे आजार : हिरड्यांच्या आजारामध्ये त्या लाल होणे, त्यातून रक्तस्त्राव होणे अशी लक्षणं आपण सारेच जाणतो. मात्र हिरड्यांचे आजार गंभीर झाल्यास आरोग्यदायी दात सुद्धा दुखू शकतात. हिरड्यांजवळील संसर्गामुळे गालाजवळील भागाला, हाडांच्या टिशूला सूज येणे अशा समस्या उद्भवू शकतात.
तोंडावर पडणे किंवा जोरदार अपघात झाल्याने दात तुटण्याची किंवा फ्रॅक्चर होण्याची शक्यता असते. मात्र हे सहसा लक्षात येत नाही. फ्रॅक्चरची तीव्रता अधिक असल्यास म्हणजेच नर्व्हमध्ये फ्रॅक्चर झाल्यास वेदना अधिक प्रमाणात जाणवतात. तसेच अपघातामुळे दातांवर पडणार्या चिरेत प्लाग व बॅक्टेरिया वाढल्यानेदेखील दातदुखी वाढू शकते.
काही वेळेस हिरड्यांचे विकार, कॅव्हीटीज अशा कोणत्याही आजारांव्यतिरिक्तही दातदुखीची समस्या उद्भवू शकते. प्रामुख्याने दातांच्या आतील भागात छुप्या स्वरुपाचे फ्रॅक्चर झाल्यास दातदुखी होऊ शकते. अशाप्रकारचे फ्रॅक्चर एक्सरे मध्ये देखील सहजपणे दिसून येत नाही. या समस्येला क्रॅक्ड टुथ सिंड्रोम असे म्हणतात. पदार्थ चावण्याच्या चुकीच्या पद्धती, रात्री झोपेत दात चावण्याची सवय, काही अपघात किंवा दातांमधील मोठ्या पोकळ्या यांमुळे ही समस्या उद्भवू शकते. कडक पदार्थ खाताना किंवा चावताना यामुळे तीव्र वेदना होऊ शकतात.
दात चावण्याची सवय असलेल्यांमध्ये दातदुखीची समस्या उद्भवू शकते. कारण दात चावताना तोंडातील टिशूवर अतिभार आल्याने दातांच्या दुखण्यासोबतच, जबड्यातील सांधे व स्नायूदेखील दुखतात.
चुकीच्या पद्धतीने दात घासल्याने हिरड्या कमी होतात. यामुळे दातांजवळील सुरक्षाकवच कमी झाल्याने अति गरम व थंड पदार्थ खाल्ल्याने त्रास होण्याची शक्यता असते. अॅसिडचे प्रमाण अधिक असलेले पदार्थ खाल्ल्याने देखील सेंसिटिव्हीटी वाढते व दात कमजोर होतात.
अक्कलदाढ येताना तीव्र वेदना होण्याची शक्यता असते. कारण ही दाढ काहीशा किंवा पूर्णपणे हिरड्यातून येते. मात्र पुरेशी जागा नसल्यास आजूबाजूच्या हिरड्यांसोबतच आजूबाजूच्या दातांवरही त्याचा परिणाम होतो. व भयंकर वेदना होऊ शकतात. मात्र अक्कलदाढ आल्यानंतर त्याची स्वच्छता बाळगणे अवघड असते. त्यामुळे संसर्ग होऊन तोंडात कीटाणू वाढण्याची शक्यता अधिक असते.
वाकडे-तिकड्या रेषेत दात असणार्या व्यक्तींना दात चावण्यची सवय असेल तर प्रत्येक दातांवर पडणार्या वेगवेगळ्या भारामुळे नसांना त्रास होऊन दात दुखण्याची शक्यता असते.
दातांना समान रेषेत आणण्यासाठी, दोन दातांमधील फ़ट कमी करण्यासाठी ब्रेसेस लावले जातात माते यामुळे बर्याचदा दातदुखी होते.
दातदुखी ही दातांच्या किंवा तोंडाच्या समस्येव्यतिरिक्तही अन्य काही करणांमुळेदेखील उद्भवू शकते.प्रामुख्याने सायनसच्या समस्येमध्ये नाकाजवळील हाडांचा भार दातांच्या मागच्या भागावर आल्याने दातदुखी होते. काही अपवादात्मक स्थितीमध्ये जबड्याचे दुखणे, दातदुखणे हे हृद्यविकाराचे लक्षण आहे.
दात पांढरेशुभ्र व निरोगी ठेवण्यासाठी हे अवश्य करा…
1. दिवसातून दोनदा दात घासणे : दात सुरक्षित आणि निरोगी ठेवायचे असेल तर दिवसातून दोन वेळा दात घासणे जरुरीचे आहे. रोज दोनदा दात घासल्याने दातात किड होत नाही आणि दात चांगले राहतात. ब्रश करण्यासाठी नेहमी मऊ केस असलेले टूथब्रश वापरावे.
2. अधिक प्रमाणात साखर खाणे वर्ज्य करा : जर तुम्हाला जास्त साखर किंवा गोड पदार्थ खाण्याची सवय असेल तर तुमचे दात लवकर खराब होऊ शकतात. त्यासाठी आपल्या आहारात साखरयुक्त पदार्थांचे प्रमाण थोडक्यात साखरेचे प्रमाण कमी करणे.
3. शीतपेय न पिणे : जर तुम्हाला शीतपेय पिण्याची सवय असेल तर तुमच्या दातांवर त्याचा विपरित परिणाम होऊ शकतो. खरे पाहता कोल्ड्रिंग, फळांचा रस हे आम्ल पदार्थ असतात. ज्याने दातांच्या इनमेल मध्ये खनिज मिसळायला लागतात. ज्यामुळे ब-याचदा दातांमुळे छिद्र व्हायला लागतात आणि दात कमकुवत व्हायला लागतात.
4. फळांचे सेवन करावे : ताजी आणि रसयुक्त फळे शरीरासाठी गुणकारी असतात. दातांना स्वस्थ आणि हेल्दी बनविण्यासाठी फळे खूप महत्त्वाची भूमिका बजावतात. फळांमुळे शरीराला ऊर्जा मिळते आणि आजारांचा धोका कमी होतो. फळे खाल्ल्याने दातांमध्ये किड लागण्याची शक्यता कमी होते.
5. भरपूर पाणी प्या : स्वस्थ राहण्यासाठी भरपूर पाणी पिणे हे जितके गरजेचे आहे तितकेच स्वस्थ दातांसाठीही भरपूर पाणी पिणे गरजेचे आहे. भरपूर पाणी प्यायल्याने दात पांढरे आणि चमकदार होतात. यासाठी दिवसातून कमीत कमी 8-10 ग्लास पाणी प्यायले पाहिजे.