(भांडूप / सुरेश सप्रे)
मुंबई भांडुप येथील पत्रकार, कब्बड्डीपटू, उत्कृष्ट कबड्डी समालोचक किशोर दादू गावडे (61) यांचे आज (शनिवारी) पहाटे झोपेतच हदयविकाराच्या तीव्र धक्क्याने दुःखद अकाली निधन झाले.
किशोर गावडे यांनी तरुणपणतच स्वतःला सामाजिक कार्यात झोकून दिले होते. ते मुंबई भांडुप साई हिल टेम्बीपाडा येथे वास्तव्यास होते. तरुणपणी नामांकित कबड्डीपटू म्हणून कब्बड्डी क्षेत्रात दबदबा होता. ते उत्कृष्ट निवेदक म्हणून कार्यरत होते. भांडुप परिसरातील सर्व कोकणी महोत्सव, मोठमोठे इव्हेंट, क्रीडा स्पर्धा यामध्ये निवेदक म्हणून आपली भूमिका पार पाडायचे. भांडुप परिसरात जेष्ठ पत्रकार म्हणून अनेक दैनिकात त्यांनी काम केले. समाजातील अनेकांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी अग्रेसर असायचे.
किशोर गावडे आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चौके या मूळ गावी आल्यावर सामाजिक कार्यात सहभागी असायचे. चौके गावचे ग्रामदैवत श्री देवी भराडी मंदिर कलशारोहणावेळी संपूर्ण कार्यक्रमाचे तीन दिवस उत्कृष्ट निवेदन केले होते. तसेच देवरूखात सोळजाई देवी क्रीडा नगरीत नगराध्यक्ष चषक कबड्डी स्पर्धेतही समालोचन केले होते. त्याचे सर्व राजकीय पक्षांच्या नेत्या बरोबर चांगले सबंध होते. भांडूप परिसरातील प्रत्येक पक्षाने आयोजीत कार्यक्रमात ते खुमासदार शैलीत निवेदन करत असत. त्याचे पश्चात पत्नी २ मुलगे, सुन, नातवंडे असा परिवार आहे. त्याचे निधनाने भांडूप- मुलुंड परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.