सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मजेशीर, असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. सध्या सोशल मीडियावर अंगाचा थरकाप उडवणारा एक व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहे. यामध्ये चक्क पाचव्या मजल्यावरुन एक जोडपे (नवरा-बायको) खाली पडताना दिसत आहे.
हा व्हायरल व्हिडीओ एका कॉलनीतील रस्त्यावरचा आहे. रस्त्यावरुन तीन तरुण मुले जाताना दिसतात. व्हिडीओत दिसते की अचानक रस्त्याच्या शेजारी असलेल्या इमारतीमधून महिला आणि पुरुष खाली पडतात आणि एकच थरकाप उडतो. या तीन तरुणांना हे महिला-पुरुष जवळपास धडकतात. इमारतीतून कुणीतरी खाली पडलेले आहे, हे पाहून हि तरुण मुले सुद्धा घाबरतात आणि थोडे दूर होतात. पण नंतर नेमके काय घडले आणि कोण पडले हे बघण्यासाठी हि मुले जवळ येतात आणि आजुबाजूला राहणारे कॉलनीतील इतर लोकही नंतर जमा होतात.
हे जोडपे पाचव्या मजल्याच्या बाल्कनीमध्ये भांडण करत होते आणि भांडता भांडता खाली पडतात. हा व्हिडीओ पाहून थरकाप उडतो. पाचव्या मजल्यावरुन खाली पडल्यानंतर या जोडप्याचा जीव वाचला की नाही, याविषयी माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.
https://twitter.com/rarelastimage/status/1738848153523380627?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1738848153523380627%7Ctwgr%5Ec8a4dd4519e12e28a8d510137da773031b7db1b5%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.topnewsmarathi.com%2Fvideo%2Fshocking-video-a-couple-accidentally-fell-on-fifth-floor-where-they-fights-in-balcony-video-goes-viral%2F