(खेड)
गांजा वाहतूकप्रकरणी मुंबई – गोवा महामार्गावर कशेडी घाटात पोलिस पथकाने अटक केलेल्या लक्ष्मण कुंदन भोरे (३९) व उज्ज्वला बाळकृष्ण मेकले (३५) (दोघेही रा. माजगावकर माळ झोपडपट्टी, सातारा) यांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. पोलिस कोठडी संपल्यावर त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले.
सातारा येथून ३ किलो ७५८ ग्रॅम गांजा घेऊन हे दोघे जण बुधवारी (दि. २०) रोजी दुपारी २:३० च्या सुमारास दुचाकीने खेडच्या दिशेने येत होते. येथील पोलिसांनी सापळा रचत दोघांनाही जेरबंद केले होते. त्यांच्याकडून ५६ हजार २५६ रुपये किमतीचा गांजा जप्त केला होता. दोघांनाही २६ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती.
गांजा प्रकरणात अनेक ठिकाणी कारवाई झाली असून, यातील मोठे मासे हाती यावेत, म्हणून पोलिसांचा तपास अजून सुरूच आहे.