(रत्नागिरी)
सामाजिक कार्याचा दांडगा अभ्यास पाहता उद्योगमंत्री श्री उदयजी सांमत यांनी प्रवीण बळवंत पवार यांच्यावर विश्वास दाखवत मिरजोळे जिल्हा परिषद गटाची जबाबदारी विभाग प्रमुख पद देत सोपवली आहे. प्रवीण पवार हे नेहमीच मिरजोळे पंचक्रोशीत सामाजिक कामात सहभाग तसेच अडीअडचणींत लोकांच्या मदतीला धाऊन जाणे अश्या अनेक गोष्टींमुळे त्यांचा नावलौकिक आहे. या सर्व बाबींचा विचार करता उद्योग मंत्री उदय सामंत यांनी मिरजोळे जिल्हा परिषद गट विभागप्रमुख पदाची जबाबदारी श्री प्रवीण बळवंत पवार यांच्यावर सोपवली आहे.
या नियुक्तीबद्दल त्यांचेवर अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे. पालकमंत्री सामंत यांनीही त्यांचे खास अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.