(रत्नागिरी)
रत्नागिरीतील रा. भा. शिर्के प्रशालेचा अमृत महोत्सव दिमाखात साजरा झाला. या अमृतमहोत्सवाच्या निमित्ताने गेल्या ७५ वर्षातील माजी विद्यार्थ्यांनी शाळेला भेट देऊन आपल्या आठवणींना उजाळा दिला. माजी विद्यार्थी आणि शिक्षकांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाने सर्वांची मने जिंकली. गीतगायन, नृत्य, नाट्यछटा, काव्यवाचन अशा विविध कलांनी अमृत महोत्सव साजरा झाला.
रा. भा. शिर्के प्रशालेला ७५ वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त अमृतमहोत्सव साजरा करण्यात आला. अमृतमहोत्सवात विविध कार्यक्रम सादर करण्यात आले. शिक्षक आणि माजी विद्यार्थ्यांचा गप्पाटप्पा कार्यक्रम रंगला. सांस्कृतिक कार्यक्रमात अभिषेक घवाळी यांनी सूर निरागस हो हे नृत्य, राजकुमार प्रधान यांनी पादुका गुरुरायाच्या हे गीत, विनया जोशी यांनी निघालो घेऊन दत्ताची पालखी हे गीत, संदेश सावंत यांनी जय जय महाराष्ट्र माझा हे गीत, कविता चक्रदेव यांनी चतुरंग शुभ घड़ी आयो रे हे गीत, प्रभाकर लोंढे यांनी शेरोशायरी, मंजिरी सावंत यांनी घर मोरे परदेसीया, धीन्डोरा बाजे हे नृत्य, सायली शिंदे यांनी रुपेरी वाळूत माडांच्या बनात ये ना हे गीत, पूजा खांबेटे यांनी मुझको हुई ना खबर हे गीत, विनया जोशी यांनी बोले रे पपीहरा हे गीत, दुर्गेश आखाडे यांनी कोकणी माणूस ही नाट्यछटा, चेतन उत्तेकर यांनी हवाओंने ये कहा हे नृत्य, अर्चना देशपांडे-शेलार यांनी बॅच १९८६ सह समुहगीत,
अश्विन गांगण यांनी यादोंकी बारात निकली है आज हे गीत, गौरी दाभोळकर यांनी मेंदीच्या पानावर हे गीत, दिपाली सामंत यांनी जय माते भवानी हे योगनृत्य, राजकुमार प्रधान यांनी विनोदी कविता वाचन, सायली शिंदे यांनी ये दिल और उनकी निगाहोंके साये हे गीत, धनश्री चौघुले यांनी रोज शाम आती थी हे गीत, संदेश सावंत यांनी पापा केहते है बड़ा नाम करेगा हे गीत, शिवप्रसाद भारती यांनी मैं हूं डॉन हे गीत, मुकूंद साळवी यांनी पाहिले न मी तुला हे गीत, संदेश सावंत आणि मुकूंद साळवी यांनी यम्मा यम्मा हे युगूलगीत, आसावरी आखाडे यांनी गणेशस्तुती गायन, सुशांत जाधव यांनी दलितांचा राजा भीमराव माझा हे गीत, अभिषेक घवाळी यांनी कथक कीर्तन नृत्य, हर्ष चव्हाण यांनी चोरु चोरुन हे गीत, प्रेरणा खेडस्कर यांनी नटरंग उभा हे गीत, सुशांत जाधव यांनी संदेसे आते है हे गीत, सांची कांबळे यांनी रिमिक्स लावणीनृत्य, महेश वरक यांनी हवा हवा ये हवा खुशबू लुटा दे हे गीत, आसावरी आखाडे यांनी मेरे ढोल ना सुन या गाण्यावरील नृत्य, समीर शिंदे यांनी यह तू कभी सोच ना सके हे गीत, सृष्टी चव्हाण यांनी हिंदी रिमिक्स गीतांवर नृत्य, साईराज महामुनी यांनी तुमसे मिलके दिल का ये जो हाल हे गीत, हर्ष चव्हाण यांनी ही दुनिया मायाजाल हे गीत, मयुरेश ठाकूर यांनी लावणीनृत्य करून उपस्थितांचे मन जिंकले.