(खेड)
आंतरराष्ट्रीय डॉन दाऊद याच्या भारतातील मालमत्ता केंद्र सरकार ताब्यात घेऊन त्यांचा लिलाव करून विकत आहे. मूळचा कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील मुंबके गावचा रहिवासी असलेल्या दाऊदच्या कुटुंबाच्या मालकीच्या आणखी चार शेतजमिनी येत्या ५ जानेवारीला लिलाव करून विकण्यात येणार आहेत.
खेडमधील मुंबके या गावातील चार जागांचा लिलाव दि. ५ जानेवारी रोजी होणार आहे. दाऊदच्या जागांचा लिलाव करीत सरकारने त्याला मोठा धक्का दिला आहे. दाऊदच्या कुटुंबीयांच्या आणखी चार शेत जमिनीचा लिलाव होणार आहे. जवळपास वीस गुंठ्याहून अधिक हे क्षेत्र आहे. चार जमिनीपैकी एका जमिनीची किंमत नऊ लाख ४१ हजार २८० रुपये इतकी आहे तर दुसऱ्या शेत जमिनीची किंमत अंदाजे ८ लाख ८७७० रुपये इतके आहे. मुंबके परिसरातील चार जागा सरकारने या पूर्वी ताब्यात घेतल्या आहेत.
या बाबत दि. २१ नोव्हेंबरला लिलाव नोटीस काढण्यात आली होती. दाऊद इब्राहिम याचे मूळ गाव खेड तालुक्यातील असून आता भारत सरकारच्या ‘साफेमा’ म्हणजे स्मगलिंग अँड फॉरेन एक्स्चेंज म्यानिप्युलेशन कायद्याच्या अंतर्गत दाऊदच्या जागा सरकार ताब्यात घेत आहे.