(चिपळूण / निलेश कोकमकर)
कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था संचलित, डॉ. ताजीराव चोरगे वरिष्ठ कला व वाणिज्य महाविद्यालय मांडकी- पालवण. या महाविद्यालयाचा राष्ट्रीय सेवा योजना (N.S.S.) २३ डिसेंबर २०२३ ते २९ डिसेंबर २०२३ पर्यंत होणाऱ्या श्रमसंस्कार निवासी शिबिराचा उद्घाटन सोहळा आबिटगाव ग्रामपंचायत येथे संपन्न झाला. या उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणून महाविद्यालयाच्या प्राचार्या सौ. अंजलीताई चोरगे मॅडम उपस्थित होत्या. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांना मोलाचे असे मार्गदर्शन केले.
या उद्घाटन कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जिजामाता कृषी महिला महाविद्यालय पालवणच्या प्राचार्य डॉ. शमिका चोरगे मॅडम यांनी मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना श्रमसंस्कार निवासी शिबिर त्यांच्या जीवनाला आकार देणारे असून या शिबिरातून विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून खूप मोठे अनुभव व संस्कार मिळतात. विद्यार्थ्यांच्या समाजाप्रती असलेले दायित्व समजते. घरापासून दूर राहिल्यावर घरच्यांचे महत्त्व समजते. या निवासी शिबिरातून मिळणारे संस्कार विद्यार्थ्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत जपावेत असे सांगितले.
यावेळी उद्घाटन विचार मंचावर आबिटगावचे सरपंच श्री. सुहास भागडे, उपसरपंच श्री. दिपक भागडे, तुरुंबव सोसायटी अध्यक्ष श्री. दिपक शिर्के, तंटामुक्ती अध्यक्ष श्री. महादेव भागडे, माजी उपसरपंच श्री. बाळाराम भागडे, माजी उपसरपंच श्री. काशीराम भागडे, गावातील प्रतिष्ठित नागरिक श्री. दादा सकपाळ, श्री. श्रीपत पवार, ग्रामपंचायत डाटा ऑपरेटर श्री.अरुण गुरव आदी मान्यवर उपस्थित होते. आपल्या प्रस्ताविक मनोगतातून कार्यक्रम अधिकारी प्रा. संदिप येलये यांनी या शिबिराचे सात दिवसीय कामकाज कसे असेल याची रूपरेषा सांगितली.
या उद्घाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन N.S.S. विद्यार्थिनी प्रतिनिधी कुमारी. साक्षी लाड हिने केले, तर आभार प्रदर्शन N.S.S विद्यार्थी प्रतिनिधी कुमार. सम्यक मोहिते यांनी केले. हा उद्घाटन कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या उपस्थित उत्साहपूर्ण पार पडला. हे शिबिर २३ डिसेंबर ते २९ डिसेंबर २०२३ रोजी आबिटगाव येथे संपन्न होत आहे.