(चिपळूण / ओंकार रेळेकर)
मुलांनी शिक्षणासोबतच क्रिडा क्षेत्रात आपली आवड निर्माण करुन विविध स्पर्धेच्या माध्यमातून पुढे येऊन आपले नांव लौकिक करायला पाहीजे. यासाठी मुलांना प्रोत्साहन देण्याचे काम पालकांनी करायचे आहे. एसीबी इंटरनॅशनल स्कूल च्या वतीने आम्ही शिक्षणासोबतच मुलांची क्रीडा क्षेत्रात प्रगती व्हावी म्हणून प्रयत्न करीत असून या शाळेतून शिक्षण घेणारा विद्यार्थी राज्यस्तरीय ,आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळणारा खेळाडू घडावा अशी आमची इच्छा आहे.
एसीबी इंटरनॅशनल स्कुलच्या माध्यमातून मुलांना शिक्षणासोबतच क्रिडा क्षेत्रात चांगले करिअर करण्याची संधी निर्माण झाली आहे. याचा मुलांनी लाभ घ्यायला पाहिजे असे मत एसीबी इंटरनॅशनल स्कूल कापसाळचे संचालक तथा तरुण उद्योजक अँड.अमोल चंद्रकांत भोजने यांनी व्यक्त केले. चिपळूण तालुक्यातील कापसाळ गावी निसर्गरम्य परिसरात वसलेल्या एसीबी इंटरनॅशनल स्कुलच्या वार्षिक क्रिडा स्पर्धा एसीबी इंटरनॅशनल स्कूलचे माजी चेअरमन तथा कोकणातील प्रतिथयश उदयोगपती अमोल चंद्रकांत भोजने यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवार दि.२१ आणि शुक्रवार दि.२२ डिसेंबर रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या.
एसीबी इंटरनॅशनल स्कुलचे चेअरमन सौ.सायली अमोल भोजने एसीबी इंटरनॅशनलचे संचालक अँड.अमोल चंद्रकांत भोजने,संचालिका सौ.पूजा शुभम खताते, गुणवत्ता अधिकारी सौ.नेहा महाडिक,मुख्याध्यापक श्री.राकेश भुरण,पर्यवेक्षक श्री.मुकुंद ठसाळे, पोफळी ग्रामपंचायत सदस्य श्री.संजय जाधव, समन्वयक ओंकार रेळेकर, समन्वयक संतोष पिलके आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. एसीबी इंटरनॅशनल स्कूलच्या वार्षिक क्रिडा स्पर्धेच्या निमित्ताने विदयार्थ्याना अभ्यासाविषयी आणि खेळाविषयी आवड निर्माण व्हावी तसेच पालकांनी आपल्या पाल्याला कोणत्या क्षेत्रामध्ये शिक्षणची संधी उपलब्ध करावी या बाबत अँड.अमोल भोजने यांनी परिपूर्ण मार्गदर्शन केले.
एसीबी इंटरनॅशनल स्कूल कापसाळ मधील पहिली ते नववीच्या विदयार्थ्यांनी मोठ्या उत्साहात क्रिडा स्पेर्धमध्ये सहभाग घेतला स्कूलच्या भव्य अशा पटांगणामध्ये क्रिकेट, चमचा गोटी धावणे, रस्सीखेच, खो-खो, लेमन स्पुन, डोक्यावर पुस्तक स्थिर ठेवून चालणे इत्यादी क्रिडा स्पर्धा संपन्न झाल्या. सुत्रसंचालन तसेच क्रिडा स्पर्धेचे समालोचन शाळेचे पर्यवेक्षक शिक्षक मुकुंद ठसाळे आणि फातिमा मुकादम यांनी केले. क्रीडा शिक्षक अमित पांचाळ, मनीष काणेकर संचालक निलेश महाडीक, रणजित भोजने, आदेश चीले, सिद्धेश भोजने, तेजस बांडागळे, शृष्ठी कदम, नइम खान, रितिका शिंदे, विजय महाडिक, संदीप चिले तसेच सर्व शिक्षक आणि कर्मचारी वृंद आदिंनी संपूर्ण स्पर्धा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विशेष मेहनत घेतली.