(संगलट / इक्बाल जमादार)
नवभारत हायस्कूल भरणे (खेड) येथील १९८१ ते १९८२ साली दहावीत असलेल्या विद्यार्थ्यांचा स्नेहसंमेलन सोहळा विसावा रिसॉर्ट पनवेल येथे उत्साहात संपन्न झाला. या सोहळ्यात सहभागी झालेले सर्व विद्यार्थी हे साठीच्या उंबरठ्यावर असून सुद्धा गुजरात, गोवा, नाशिक, जळगाव अशा दुरुन सोहळ्यासाठी उपस्थित राहिले होते.
पहिल्या रात्री प्रत्येकाने ४१ वर्षापूर्वीच्या अविस्मरणीय आठवणींना उजाळा देत मनसोक्तपणे गप्पागोष्टी केल्या. दुसऱ्या दिवशी प्रत्येकाने खूप धमाल मस्ती केली. आम्ही साठीच्या वयाचे असलो तरी आम्ही अजून तरुण आहोत, हा आदर्श सर्वांसमोर ठेवला. जीवन किती जगावे, त्यापेक्षा मिळालेले जीवन कसे जगावे हे ज्याला कळले तो खऱ्या अर्थाने जीवन जगला, हे या विद्यार्थ्यांकडून घेण्यासारखे होते.
सदर सोहळा हा त्यांच्यासाठी एक सुवर्णक्षण होता. सोहळ्यासाठी आपला बहुमूल्य वेळ देत सोहळा आनंदात उत्साहात यशस्वी करण्यासाठी प्रत्येकाने खूप मेहनत घेतली होती. स्नेहसंमेलन सोहळा दुसऱ्या दिवशी दुपारी चार वाजेपर्यंत संपन्न झाला. प्रत्येक जण आपल्या जुन्या आठवणी अंतर्मनात ठेवून एकमेकांचा निरोप घेत परतीच्या प्रवासाला निघाले.