(नवी दिल्ली)
प्रवाशांना सर्वाधिक लोकप्रिय वाटणारे शहरामध्ये सर्वात जास्त प्रवाशांनी हैदराबादला पसंती दिली आहे. तर उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक प्रवाशांनी प्रवास केला आहे. ओयो ट्रॅव्हलोपीडिया २०२३ ने याबाबतची माहिती दिली आहे. शहराचा विचार केला हैदराबादनंतर बंगळुरुचा क्रमांक लागतो.
उत्तर प्रदेश हे प्रवाशांनी सर्वाधिक भेट देणारे राज्य ठरले आहे. या यादीत महाराष्ट्र दुस-या क्रमांकावर आहे. ओयोने दिलेल्या माहितीनुसार, वार्षिक प्रवास ट्रेंड इंडेक्स – ट्रॅव्हलोपीडिया २०२३ नुसार, वर्षातील इतर कोणत्याही वीकेंडच्या तुलनेत ३० सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान सर्वाधिक बुकिंग झाले आहेत. गोलकोंडा किल्ला, चारमिनार, रामोजी फिल्म सिटी ही ठिकाणे निजामाचे शहर हैदराबादच्या सौंदर्यात भर घालतात. या ठिकाणांव्यतिरिक्त, हैदराबादमध्ये इतर अनेक ठिकाणे आहेत जिथे दरवर्षी पर्यटकांची गर्दी होते.
हैदराबादमध्ये अनेक हिल स्टेशन्स आहेत जिथे तुम्ही उन्हाळ्याच्या उष्णतेपासून मुक्त होऊ शकता. तुमची उन्हाळी सुट्टी संस्मरणीय बनवण्यासाठी हैदराबादजवळ या हिल स्टेशन्सपेक्षा चांगली जागा असू शकत नाही. हैदराबादपासून अनंतगिरी हिल्सचे अंतर सुमारे ८१ किमी आहे. जर तुम्ही साहसप्रेमी असाल आणि ट्रेकिंगची आवड असेल तर तुम्ही अनंतगिरी हिल्सवर जाऊ शकता. हैदराबादजवळच्या या हिल स्टेशनवर तुम्ही निसर्ग अगदी जवळून पाहू शकता. येथे तुम्ही ट्रेंिकग सारख्या मजेदार क्रियाकलाप देखील करू शकता. येथे फेरफटका मारताना तुम्हाला दरी आणि धबधब्यांची विलोभनीय दृश्येही पाहता येतात. रॉक क्लाइंबिंग, बॅलन्सिंग बोर्ड, स्पायडर वेब आणि टारझन स्विंग सारखे उपक्रम येथे दिले जातात.
हैदराबाद हे भारतातील सर्वाधिक प्रवाशांनी बुकिंग केलेले शहर आहे. त्यापाठोपाठ बंगळुरु, दिल्ली आणि कोलकाता यांचा क्रमांक लागतो. दुसरीकडे गोरखपूर, दिघा, वारंगल आणि गुंटूर सारख्या लहान शहरांमध्ये सर्वाधिक वार्षिक बुकिंगमध्ये वाढ झाली आहे. ओयोने दिलेल्या माहितीनुसार, २०२३ मध्ये जयपूर हे लोकप्रिय हॉलिडे डेस्टिनेशनमध्ये अव्वल आहे. त्यानंतर गोवा, म्हैसूर आणि पुद्दुचेरीचा क्रमांक लागतो.
बुकींगच्या बाबतीत पुरीला अध्यात्मिक आणि तीर्थक्षेत्रांमध्ये अव्वल स्थान मिळाले आहे. यानंतर अमृतसर, वाराणसी आणि हरिद्वार या शहरांचा क्रमांक लागतो. देवघर, पलानी आणि गोवर्धन सारख्या कमी ज्ञात अध्यात्मिक स्थळांवर पर्यटकांची संख्याही लक्षणीय वाढल्याचे निवेदनात म्हटले आहे. राज्यांबद्दल बोलायचे झाले तर उत्तर प्रदेश या वर्षी सर्वाधिक बुक झालेले राज्य होते. त्यापाठोपाठ महाराष्ट्र, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशचा क्रमांक लागतो.