(रत्नागिरी)
केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना आपल्याकडे राबविल्या जात आहेत. सदर योजना अत्यंत महत्त्वाच्या व सामान्य माणसाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आवश्यक आहेत. जाधव फिटनेस तर्फे ॲकेडमी भैय्याशेठ सांमत यांच्या मार्गदर्शनाखाली माजी उपनगराध्यक्ष रोशन फाळके व उद्योगक कौशल फाळके यांच्या सहकार्याने कँप घेऊन व घरोघरी जाऊन सदर योजना सामान्य माणसाला सांगितल्या जात आहेत.
जाधव ॲकेडमीने योजना सोप्या भाषेत समजण्यासाठी ॲकेडमी तर्फे परिपत्रक काढले गेले आहे. त्या योजनांचा पाठपुरावा करून लाभार्थ्यांना लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न ॲकेडमी अध्यक्ष भैय्याशेठ सांमत यांच्या मार्फत केला जात आहे. या योजना सर्वसामान्यांना समजावून सांगत असताना काही त्रुटी ॲकेडमीच्या निदर्शनास आल्या आहेत. त्या दूर होणे आवश्यक वाटल्यामुळे त्याचे निवेदन आज मंत्री सामंत देण्यात आले. मंत्री सामंत यांनी सर्व म्हणणे ऐकून घेवून त्यात सुधारणा केली जाईल असे आश्वासन दिले
ॲकेडमीला आढळलेल्या त्रुटी खालीलप्रमाणे आहेत 1) विशेष अर्थ साहाय्य योजनेत उत्पन्नाची अट वार्षिक २१ हजार रुपये आहे म्हणजे रोजचे ५८ रुपये होतात. ही उत्पन्नाची मर्यादा वाढणे आवश्यक आहे २) आभाकर्ड सर्व हाँस्पीटलला लागु होत नाही आहे. अधिक माहिती घेतल्यावर असे समजले की शासनाकडून आभाकार्ड पैसे देताना विलंब होत आहे व त्यासाठी टक्केवारी मागितली जात आहे ३) जिल्हा उद्योग केंद्रामार्फत राबविल्या जाणाऱ्या सर्व योजना योग्य प्रकारे राबविणे आवश्यक आहे. बँकेत बेरोजगाराला लोन देण्यासाठी माँरगेज मागितले जात आहे, अन्यथा लोन मंजूर करण्यास विलंब केला जात आहे. या व अशा त्रुटी दुर होणे आवश्यक वाटते तसे निवेदन ॲकेडमी अध्यक्ष भैय्याशेठ सांमत यांनाही देण्यात आले आहे. तरी या त्रुटी लवकरात लवकर दूर झाल्यास सर्व योजनांचा फायदा सर्व सामान्य माणसाला होईल, असे ॲकेडमी तर्फे सांगण्यात आले.