(रत्नागिरी)
शहरातील टिळकआळी येथील लॉजमध्ये राहणाऱ्या एका तरुणाच्या खोलीतील १२,७०० रुपयांचे साहित्य चोरीला गेले आहे. या प्रकरणी गुहागर येथील एका तरुणावर रत्नागिरी शहर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही चोरीची घटना १५ ऑक्टोबर २०२३ रोजी घडली.
याबाबत प्रशांत प्रभाकर महाडिक (३५, रा. मिरजोळे, रत्नागिरी) यांनी फिर्याद दिली आहे. शुभम सुनील पवार (२७, रा. साखरी खुर्द, गुहागर) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. महाडिक एका कंपनीत कामाला असून, ते रत्नागिरी टिळकआळीत एका लॉजमध्ये ए. सी. खोलीत राहत होते. त्यांच्या खोलीतील लिफ्टचा रिमोट, ब्लूटुथ, मोबाइल चार्जर आणि हेडफोन असे एकूण १२,७०० रुपयांचे साहित्य चोरीला गेले आहे. प्रशांत महाडिक यांच्या फिर्यादीनुसार शहर पोलिस अधिक तपास करत आहेत.