(संगमेश्वर)
ज्येष्ठ समाजसेवक, राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ते तथा जमातुलमुस्लिमीन कडवईचे माजी अध्यक्ष इस्माईल महमद जुवळे ऊर्फ नाना जावळे (८८) यांचे गुरुवारी सकाळी पुणे येथे निधन झाले. मागील बारा दिवसांपासून ते आजारी होते. सामान्य माणसांचा आधारवड म्हणून त्यांचा सर्वत्र लौकीक होते.
त्यांच्या पश्चात मुलगा मोअझ्झम जुवळे व तीन मुली दिलशाद, शमशाद, शेरबानू, नातवंडे, जावई असा परिवार आहे. नाना जुवळे यांनी विविध संघटनांमध्ये राहून जनसामान्यांच्या दुःखावर फुंकर घालून त्यांचे सत्व जपणारे व संघर्षाची प्रेरणा देणारे व्यक्तीमत्व म्हणून त्यांची ओळख संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात होती. जमातुल मुस्लिमीन कडवईच्या माध्यमातून त्यांनी साडेचार दशकं विविध सामाजिक उपक्रम राबविले. वेगवेगळ्या प्रकल्पाच्या माध्यमातून वंचितांना आधार दिला. गरिब व निराधारांचाही ते आधार होते.