(नवी दिल्ली)
मागील काही महिन्यांपासून महागाईमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. त्यातच आता सर्वसामान्य जनतेला मोठा दिला आहे. सरकारने नोव्हेंबर महिन्याची किरकोळ चलनवाढीची आकडेवारी जाहीर केली आहे. त्यामुळे भारताचा किरकोळ महागाई दर नोव्हेंबरमध्ये वार्षिक आधारावर ५.५ टक्यांनी वाढला आहे. तर ऑक्टोबरमध्ये हा महागाई दर ४.८७ टक्क्यांवर होता. वित्त मंत्रालयाने नोव्हेंबर महिन्यातील किरकोळ आणि खाद्यपदार्थांच्या महागाईची आकडेवारी जाहीर केली आहे. त्यामुळे ऑक्टोबरच्या तुलनेत नोव्हेंबरमध्ये महागाई वाढली आहे.
खाद्यपदार्थांच्या किमतीमध्ये वाढ झाल्याने नोव्हेंबर महिन्यात अन्नधान्य महागाई ८.७ टक्के झाली आहे. तर ती 6.6 टक्के होती. रॉयटर्सच्या सर्वेक्षण अहवालात अन्नाच्या किंमतीतील अस्थिरतेमुळे,किरकोळ चलनवाढ अनुक्रमिक आधारावर ८० अंकांपेक्षा जास्त ५. ७ टक्क्यांनी वाढेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. गेल्या आठवड्यात डिसेंबरच्या धोरण बैठकीत आरबीआयने चलनवाढीचे लक्ष्य ५.४ टक्क्यांवर कायम ठेवले होते. ऑगस्टच्या धोरणात, RBI MPC ने आर्थिक वर्ष २०२४ साठी महागाई ५.१टक्क्यांवरून ५.४ टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. RBI चे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी किरकोळ महागाई किंवा CPI डेटा तिसऱ्या तिमाहीत ५.६ टक्के आणि चौथ्या तिमाहीत ५.२ टक्के असा अंदाज व्यक्त केला होता.
किरकोळ महागाई दरामध्ये वाढ झाल्यामुळे सर्वसामान्याना मोठा झटका बसला आहे. अर्थमंत्री निर्मला सीताराम यांनी ११ डिसेंबरला संसदेत सांगितले होते की किरकोळ महागाई दर स्थिर आहे. परंतु १२ डिसेंबर रोजी जाहीर झालेल्या आकडेवारीने लोकांना आश्चर्यचकित केले आहे. ही महागाई कमी करणे सरकारपुढे आव्हान असेल.