(रत्नागिरी / प्रतिनिधी)
जिल्ह्यातील क्रेडिट ॲक्सेस इंडिया फाउंडेशन व क्रेडिट ॲक्सेस ग्रामीण लिमिटेड (ग्रामीण कुटा) पुणे झोन व रत्नागिरी शाखेच्या वतीने शुक्रवारी (दिनांक ८ डिसेंबर २०२३ ) रत्नागिरी पोलीस दलाला वीस बॅरिकेड्स देण्यात आले. या राबविलेल्या उपक्रमाचे जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी कौतुक केले आहे.
भारतातील अग्रेसर मायक्रो फायनान्स कंपनी म्हणून क्रेडिट ॲक्सेस ग्रामीण लिमिटेड कंपनीची ओळख आहे. कंपनीच्या मार्फत विविध सामाजिक उपक्रम राबविले जात असतात. गरीब गरजू विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप अन्य सामाजिक उपक्रमातून कंपनी आपले योगदान देत असते. त्याचाच एक भाग म्हणून यावर्षी क्रेडिट ॲक्सेस ग्रामीण लि. मार्फत रत्नागिरी शाखेच्या वतीने रत्नागिरी पोलिसांना वाहतूक नियमन आणि बंदोबस्तासाठी तब्बल वीस बॅरिकेड्स उप्लब्ध करून देण्यात आले आहेत. रत्नागिरी विभाग प्रमुख श्री.वैभव धर्मे (डिएम), रत्नागिरी क्षेत्र प्रमुख श्री. योगेश कुरणे (AAM), श्री.गजेंद्र पाटील (बीएम) श्री.अक्षय भोसले (बीएम) अनिल कांबळे (बीएम) यांच्या उपस्थितीत नुकतेच बॅरिकेड्स सुपूर्द करण्यात आले. यावेळी जिल्हा अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांच्यासह नीलेश माईणकर (एसपी), एस जी माने (पीआय), रमेश निकम (आरपीआय), राजेंद्र भाटकर (एपीआय) आदी पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
अप्पर अधीक्षकांनी केले विशेष कौतुक
अतिशय चांगल्या दर्जाचे साहित्य वापरून तयार केलेले बॅरिकेड्स तसेच चांगले स्टिकरिंग आणि कोट्स हे पाहून अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांनी कंपनीने कौतुकास्पद राबविलेल्या CSR उपक्रमांचे विशेष कौतुक केले आहे. तसेच कार्यक्रमाला उपस्थितीत असलेल्या पोलिस निरीक्षकांनी देखील कंपनीचे तोंडभरून कौतुक केले आहे.