(जाकादेवी / वार्ताहर)
रत्नागिरी तालुक्यातील जाकादेवी देवस्थान खालगाव गोताडवाडीतर्फे प्रति वर्षाप्रमाणे यावर्षीही जाकादेवी देवस्थानची यात्रा व देव दिवाळी उत्सव मंगळवार दि. १२ ते गुरूवार दि.१४ डिसेंबर या तीन दिवशीय कालावधीत भरगच्च धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी आयोजित करण्यात आला आहे.
मंगळवार १२ रोजी सकाळी नित्य पूजा आरती, सहस्रनाम, दु.१२ वा.जाकादेवी दिनदर्शिका प्रकाशन सोहळा, सायंकाळी नित्य पूजा व आरती, बुधवार दि.१३ रोजी सकाळी नित्य पूजा आरती, सकाळी ७ वा. यात्रा, देवदर्शन प्रारंभ, नित्यपूजा, रात्री आरती भोवत्या, रात्री १०.३० वा स्थानिक गोताडवाडी खालगाव यांचे बहुरंगी लक्षवेधी नमन, गुरुवार दि. १४ रोजी नित्य पूजा आरती , सकाळी ११ वा. सत्यनारायण महापूजा दु. १ ते रात्री ८ वा. पर्यंत तीर्थप्रसाद , दु.१ वा.महिलांचे हळदीकुंकू, सायंकाळी नित्य पूजा,आरती भोवत्या, रात्री ठिक १०.३० वा. दशरथ राणे लिखित, उल्हास गोताड दिग्दर्शित आम्ही लग्नाळू हा जाकादेवी देवस्थान खालगाव गोताडवाडी निर्मित दोन अंकी नामांकित नाट्यप्रयोग सादर होणार आहे.
हा तीन दिवसीय वार्षिक उत्सव यशस्वी करण्यासाठी जाकादेवी देवस्थान खालगाव गोताडवाडी, श्री जाकादेवी देवस्थान मुंबई मंडळ, श्री. कुलस्वामिनी सेवा मंडळ व महिला मंडळ खालगाव गोताडवाडी, तसेच भाविक मेहनत घेत आहेत. या देवदिवाळी यात्रेच्या दिवशी पंचक्रोशीत भाविकांसाठी एस.टी. महामंडळाच्यावतीने जादा बस सेवेची व्यवस्था कमिटीच्या माध्यमातून करण्यात आली असल्याचेही सांगण्यात आले.
बुधवार दि.१३ रोजी सर्वदूर प्रसिद्ध असलेल्या जाकादेवी देवस्थानच्या दर्शनासाठी रत्नागिरी तालुक्यासह जिल्हा परजिल्ह्यातील शेकडो भाविक मोठ्या भक्तीभावाने उपस्थित राहणार आहेत. या भाविकांसाठी अपेक्षित सर्व सुविधा येथील देवस्थान कमिटीने सज्ज ठेवल्या आहेत.