(संगमेश्वर)
तालुक्यातील चिखली गावातील विविध विकास कामांचे भुमिपुजन आमदार शेखर निकम यांच्या हस्ते करण्यात आले. आमदार निकम यांच्याकडून विकास कामांच्या भूमिपूजनाचा धडाका सुरू आहे.
आमदार निकम यांनी जिल्हा वार्षिक योजना-शाळा दुरुस्ती, 2515 योजना, आमदार स्थानिक विकास कार्यक्रम या योजनांतून मंजूर केलेल्या चिखली गुरववाडी वसंत पाध्ये यांच्या घराकडे जाणारा रस्ता, चिखली बौद्धवाडी जि. प. शाळा खोली दुरुस्ती, चिखली धनावडेवाडी गणपती विसर्जन घाट पाखाडी बांधणे, चिखली राजीव पाध्ये यांच्या घराकडे जाणारा रस्ता अशा एकूण 14 लाख रु. कामांचे भुमिपुजन झाले. चिखली गावच्या सरपंच मैथिली कानाल व ग्रामस्थांच्या बहुसंख्य उपस्थितीत हा भुमिपुजनाचा कार्यक्रम पार पडला. गावातील रस्ते, पाखाडी, शाळा दुरुस्ती कामे होण्यासाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करीत आमदार महोदयांनी आपल्या विकास फंडातून सदर कामे मंजूर केल्याबद्दल ग्रामस्थांनी आमदार शेखर निकम यांचे आभार मानले.
यावेळी संगमेश्वर तालुकाध्यक्ष राजेंद्र पोमेंडकर, सरपंच मैथिली कानाल, उपसरपंच ममता साळंखे, र. जि. म. बँकेचे संचाकक राजेंद्र सुर्वे, गावकर अरुण कानाल, दत्ताराम ओकटे, मासरंग गावचे सरपंच राजेंद्र ब्रीद, मावळंगे गावचे सरपंच प्रकाश वीर, धर्मदास मोहिते, सिताराम चिले, संजय खातु, संतोष भडवळकर, दिपक चव्हाण, सचिन कदम, रोहिदास मयेकर, दत्ताराम पंडव, विजय धनावडे, अरुण कदम, पाटील मॅडम, संतोष जाधव, मोहन ओकटे, सचिन कदम, राहिल कडवेकर, लिलाधर पंडित अरुण कदम, धकटू पाचकले, सुरेश पाचकले, रमेश होडे, रवि पाचकले, विजय चव्हाण व ग्रामस्थ आदी उपस्थित होते.