(संगमेश्वर / प्रतिनिधी)
तळेकांटे ग्रामपंचायत सरपंच पदाच्या निवडणूकीत मोठया चुरशीने मतदान झाले. यामध्ये भाजपाच्या उमेदवार सौ. सुषमा संदीप बने या विजयी झाल्या. सरपंचपदी विराजमान झाल्याबद्दल रत्नागिरी (दक्षिण) भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी आज शनिवारी ( दिनांक ९ डिसेंबर २०२३ ) भेट घेऊन स्वागत केले.
नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत तळेकांटे ग्रामपंचायतमध्ये भारतीय जनता पार्टी तर्फे सरपंच पदी लोकांमधून निवडून आलेल्या सौ.सुषमा संदीप बने सरपंच पदी विराजमान झाल्याबद्दल त्यांना भाजपा दक्षिण जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, तालुकाध्यक्ष (दक्षिण) रुपेश कदम यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. गावातील सर्व स्तरावरील नागरीकांना सुखसुविधा पुरवण्यासाठी भारतीय जनता पार्टी आपल्या पाठीशी भक्कमपणे उभी राहील असे आश्वासन दिले व जी मदत लागेल ती नक्कीच आपण करू असे आश्वासन जिल्हा अध्यक्ष राजेश सावंत यांनी दिले.
यावेळी भारतीय जनता पार्टी दक्षिण संगमेश्वर मंडळ अध्यक्ष रुपेश कदम तालुका, जिल्हाचिटणीस संदीप बने, सरचिटणीस सचिन बांडांगळे, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष प्रथमेश धामणस्कर, नूतन ग्रामपंचायत सदस्य श्री सांडीम व गावातील प्रतिष्ठित व्यक्ती व कार्यकर्ते आदी उपस्थित होते.
जनतेने भाजपच्या उमेदवाराला सरपंच म्हणून निवडून दिले हाच भाजपाचा मोठा विजय आहे. जनतेने दाखवलेला विश्वास आम्ही टिकवून ठेवणार आहोत. तसेच गावातील प्रत्येकाला केंद्र व राज्य सरकारच्या योजनांचा लाभ मिळावा हेच उदिष्ट समोर ठेवा. काही अडचणी आल्यास संपर्क साधा.
– भाजपा तालुकाअध्यक्ष रुपेश कदम