(सिंधुदुर्ग)
देवगड समुद्र किनारी पर्यटनासाठी आलेले सहा पर्यटक बुडाले आहेत. पुणे येथील खासगी सैनिक अकॅडमीचे सहा विद्यार्थी असल्याची माहिती आहे. सहा जणांपैकी चौघांचे मृतदेह सापडले असून एकावर देवगड ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर एकाचा शोध सुरू आहे. सहा विद्यार्थांमध्ये चार मुली आणि एक मुलाचा समावेश आहे. चार मुलींचे आणि एका मुलाचा मृतदेह सापडला आहे, तर एक विद्यार्थी बुडाला असून त्याचा शोध सुरू आहे. हे सहा विद्यार्थी समुद्रात आंघोळीसाठी गेले असताना ही दुर्दैवी घटना घडली.
दुपारी तीन ते चारच्या सुमारास ही घटना घडली आहे. पिंपरी चिंचवड येथील सैनिक अकॅडमीची ३५ जणांची सहल देवगड येथे आली होती. समुद्रात आंघोळीसाठी उतरले असता पाण्याचा अंदाज न आल्याने सहाजण बुडाले. सर्व मृतदेह ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले आहेत. मृतांमध्ये प्रेरणा डोंगरे, अंकिता गालटे, अनिशा पडवळ, पायल बनसोडे, राम डिचोलकर यांचा समावेश आहे. एकाच शोध सुरू आहे. एका विद्यार्थ्यांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याचे नाव आकाश तुपे असून त्याला वाचविण्यात आले आहे. तर राम डीचोलकर असे बेपत्ता तरुणाचे नाव असल्याची माहिती मिळत आहे.