(रत्नागिरी)
तालुक्यातील कोठारवाडी-कोळीसरे येथील प्रौढाने खोकल्याचे औषध समजून गवत मारण्याचे औषध प्राशन केले. यामध्ये त्याचा जिल्हा रुग्णालयात अधिक उपचार चालू असताना मृत्यू झाला. केशव दामोदर चौगुले (वय ३९, रा. कोठारवाडी- कोळीसरे, रत्नागिरी) असे मृत प्रौढाचे नाव आहे. सदर घटना गुरुवारी (ता. ७) सकाळी साडेदहाच्या सुमारास जिल्हा रुग्णालयात घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केशव चौगुले यांना खोकला लागला होता. चुकून त्यांनी घरात सोड्याच्या बाटलीत ठेवलेले गवत मारण्याचे औषध प्राशन केले. त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने कुटुंबियांनी तातडीने खंडाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. तिथून अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. उपचारादरम्यान गुरुवारी त्यांचा मृत्यू झाला.