(संगलट / वार्ताहर)
मुंबई गोवा महामार्गावरील भोस्ते घाटात खडी वाहतूक करणारा डंपर टायर फुटल्याने उलटून अपघात झाल्याची घटना आज मंगळवारी दुपारी तीन वाजता वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातात चालक सुदैवाने बचावला आहे.
भोस्ते घाट उतरून खेडच्या दिशेने येणाऱ्या डंपरचा अचानक टायर फुटला, त्यामुळे चालकाचे डंपर वरील नियंत्रण सुटल्याने डंपर रस्त्याच्या मधोमध उलटला. यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खडी पडल्याने एका बाजूकडील वाहतूक पूर्ण ठप्प झाली होती.
दरम्यान, अपघातानंतर चालक केबिनमध्ये अडकून पडला होता. त्याला स्थानिक ग्रामस्थांनी बाहेर काढले काढत कळंबनी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.