(रत्नागिरी)
लांजा तालुक्यातील गवाणे ग्रामपंचायत ही प्रतिष्ठेची समजली जाते. या ग्रामपंचायतीवर अनेक वर्ष शिवसेनेचा भगवा डौलाने फडकत आहे. या गावातील सुमारे दोन हजारच्या आसपास असणाऱ्या मतदान असून गववाणे जिल्हा परिषद गटातील हे गाव जिल्हा परिषद सदस्य नेमणूकीसाठी महत्वाची भूमिका बजावत असते. या ग्रामपंचायतीवर उबाठा गटाचे वर्चस्व गेले अनेक वर्ष कायम आहे. मात्र या गावाचे सरपंच भीमराज कांबळे यांनी पालकमंत्री उदय सामंत आणि किरण सामंत यांचे नेतृत्व स्वीकारत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेने गटाला अखेरचा जय महाराष्ट्र करत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
गवाणे ग्रामपंचायत सरपंच भीमराज कांबळे हे राजापूर लांजा विधानसभा मतदार संघांचे आमदार राजन साळवी यांचे कट्टर समर्थक असल्याचे बोलले जात आहे. काही दिवसापूर्वी येथील काही ग्रामपंचायत सद्स्यानी उबाठा गटाला जय महाराष्ट्र करत एकनाथ शिंदे यांच्या शिंदे गटाच्या शिवसेनत जाहीर प्रवेश केला होता. मात्र गेली अनेक महिने वेटिंगवर असलेले सरपंच भीमराज कांबळे यांनी रविवारी किंगमेकर म्हणून ओळखले जाणारे किरण सामंत यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला.
या कार्यक्रमाला अपूर्वा सामंत, तालुकाप्रमुख गुरुप्रसाद देसाई, संतोष रेवाळे, रोहन पावस्कर, अभि दाभोळकर, आत्माराम करमेळे, आकाश ढेकणे, भगवन ढेकणे, अल्ताफ काजी, मोहसीन दसुरकर, शैलेश पडवळकर, संजय तेंडुलकर, भाई कामत उपस्थित होते.