(कळझोंडी / किशोर पवार)
पुणे देहू येथे आमदार चषक २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या भव्य क्रिकेट स्पर्धेत अंतिम सामना नायरा इलेव्हन तळेगांव विरुद्ध आदिष्री इलेव्हन संघ यांच्यात झाला. यामध्ये आदिष्री एलेव्हन संघ विजयी झाला. उपविजेता नायरा इलेव्हन संघातील अष्टपैलू खेळाडू सुमित पवार याने आक्रमक फलंदाजी करत ९० धावांची भरीव कामगिरी केली.
आपल्या भेदक गोलंदाजीने ७ गडी त्याने बाद केले. त्याच्या या लक्षवेधी कलाकौशल्याचे प्रदर्शन पाहून तमाम क्रिकेट प्रेमींच्या डोळ्यांचे पारणेच फिटले. सुमित या अष्टपैलू खेळाडूला अंतिम स्पर्धेतील सामनावीर म्हणून घोषीत करून त्याला मोटार सायकल, दोन दर्जेदार बॅटस् व भरीव रोख रक्कम देऊन आमदार सुनिल शेळके, अतुलदादा मराठे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. या प्रसंगी तमाम क्रिकेट प्रेमींनी टाळ्यांच्या कडकडाटीने भव्य स्वागत केले.
पुणे देहू येथील या रंगतदार अटी-तटीच्या अंतीम सामन्याचा निकाल जाहीर होताच सुमित पवार हा सध्या मवाळ पुणे येथे रहात आहे. त्याचे मूळ गाव रत्नागिरी जिल्ह्यातील कळझोंडी होय. या मालिकावीर सुमितवर तमाम क्रिकेट प्रेमींकडून अभिनंदनाचा वर्षाव केला.
सुमित हा एम.एस.धोनीचा चाहता आहे. उत्तम क्षेत्ररक्षण, आक्रमक फलंदाजी, व भेदक गोलंदाजी या अष्टपैलू कामगिरीमुळे सुमित पवार याने क्रिकेट प्रेमींच्या हृदयात आपले नाव कोरले आहे. या स्पर्धेचे आयोजन क्रिकेट प्रेमी नागरीक सौरभ काळोखे, गणेश मराठे आदींनी केले.