( लांजा )
तालुक्यातील वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी’गाव तिथं शाखा’ स्थापन करण्यावर जोर दिला आहे. मौजे गोविळ येथे सोमवारी (दिनांक २७ नोव्हेंबर २०२३) वंचित बहुजन आघाडीची शाखा स्थापन करण्यात आली.
शिवाजी पार्क येथील ॲड प्रकाश आंबेडकर यांच्या सभेनंतर तालुक्यात वंचित कार्यकर्त्यांनी शाखा बांधणी कार्यक्रम हाती घेतले आहेत. या कार्यक्रमाअंतर्गत गाव तिथं शाखा स्थापन करण्याचा निर्धार वंचीत आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. गाविळ येथील शाखा स्थापन करून सक्रिय कार्यकर्त्यांना तत्काळ नियुक्त्या देखील देण्यात आल्या. यामध्ये शाखा अध्यक्ष अशोक पवार, उपाध्यक्ष राजेश पवार, सचिव सिद्धार्थ पवार ,संघटक नितीन पवार, महिला अध्यक्षा सिद्धी संजय पवार, उपाध्यक्ष अनिता पवार, सचिव पूजा पवार, संघटक संघमित्रा पवार तसेच आसगे जी. प. गट उपाध्यक्ष विजय पवार, वेरवली पं. स. गण सचिव मोहन पवार, या सर्व पदाधिकाऱ्यांना वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तालुका पदाधिकाऱ्यांनी नियुक्ती पत्र देऊन गोविळ शाखेला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष जे बी कांबळे, तालुका उपाध्यक्ष मोहन धनावडे, महासचिव प्रभाकर कांबळे, सचिव राजेंद्र कांबळे, संपर्क प्रमुख वि. धा. जाधव, जि. उपसचिव संदेश जाधव, पं. स. गवाणे गण अध्यक्ष अशोक कांबळे, जगन्नाथ कांबळे आदी कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.