(रत्नागिरी)
रत्नागिरी जिल्ह्यातील जिल्हा परिषद गट पाली येथे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान हातखंबा प्रभाग पंचायत समिती रत्नागिरी यांच्या अंतर्गत काम करणाऱ्या महिला बचत गटांसाठी पाली येथे जिल्हा नियोजन मधून २ कोटी रुपये खर्च करून आज विक्री केंद्रचे भूमिपूजन राज्याचे उद्योगमंत्री रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते संपन्न झाला.
हा उपक्रम महाराष्ट्र मधील महिला बचत गटाचे विक्री केंद्राचा पायलेट प्रोजेक्ट जिल्हा परिषद पाली मध्ये सुरवात झाली याची इतिहासात नोंद होणारा असून पाली गटातील महिला याचे साक्षीदार आहेत. याचा लाभ महिलांनी घेणे गरजेचं आहे.दिल्लीच्या आंतराष्ट्रीय व्यापार मेळाव्यात रत्नागिरीच्या कमीत कमी ५ बचत गटांनी सहभागी होतील असे काम करा असे आहवान पालकमंत्री उदय सामंत यांनी या कार्यक्रमाच्या वेळी केले. कितीही मांजरे माझ्या आडवे आली तरी मी मागे जाणार असून दुपट्टीने काम करून विरोधकाना उत्तर देणार असल्याचा चिमटा यावेळी पालकमंत्री उदय सामंत यांनी काढला. बचत गटांनी उत्पादन केल्यानंतर त्याचे पॅकिंग आणि त्याचे मार्केटिंग यावर मार्गदर्शनही केले.
या कार्यक्रमाला जिल्हा प्रमुख राहुल पंडित,महिला जिल्हा प्रमुख शिल्पा सुर्वे,प्रांतधिकारी जीवन देसाई, प्रकल्प संचालिका नंदिनी घाणेकर, गटविकास अधिकारी जे. पी. जाधव, तालुका प्रमुख बाबू म्हाप, महिला तालुका प्रमुख कांचन नागवेकर, सरपंच विठ्ठल सावंत, सरपंच विघ्नेश कोत्रे, उत्तम सावंत, विभाग प्रमुख विद्याताई बोंबले, निवळी सरपंच तन्वी कोकजे, गजानन सुवारे, सुरेश ताम्हणकर, विनायक शिगवन, तृप्ती पेडणेकर, बाबू शिगवन, गौरव संसारे, अनिल पाडावे, प्रमोद डांगे, महिला बचत गटाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.