(मुंबई)
रविवार दिनांक २६ नोव्हेंबर रात्रौ ८:०० वा. श्री. संजय (भाऊ) दिना पाटील यांनी भांडूप पश्चिम येथे कोकणवासियांच्या जाहीर मेळावा आयोजित केला होता. या कार्यक्रमास निमंत्रित रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसेना (उबाठा) खासदार श्री. विनायक राऊत तसेच शिवसेना (उबाठा) सचिव श्री. आदेश बांदेकर यांस कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघ (रजि) ठाणे संघटनेचे सदस्य यांनी सदिच्छा भेट घेवून शाल देत, कोकणवासियांच्या समस्यांबाबतचे निवेदन पत्रक दिले.
सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकास श्री मधू दंडवते टरमिनस असे नामांकरण करणेसंबधी तसेच सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकात महत्त्वाच्या गाड्यांस थांबे आणि स्थानक सुधारणा करणेसंबंधी निवेदन देण्यात आले. मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण काम मार्गी लावून लवकरात लवकर लोकार्पण करणेसंबधीही अशा विषयांसंबंधीचे निवेदन पत्रात आवर्जून उल्लेख करण्यात आला.
यावेळी निवेदन देताना श्री. राजू सुदाम कांबळे – प्रमुख सल्लागार, श्री. संभाजी बाळू ताम्हणकर – खजिनदार, श्री. परेश महीपत गुरव – सचिव, श्री. दर्शन पांडुरंग कासले – सचिव, श्री. प्रसन्ना दिनकर फावसकर – उपखजिनदार, श्री. मंगेश घाडीगांवकर – सदस्य, श्री. अमित चव्हाण – सदस्य, श्री. जितेंद्र बाईत – सदस्य आदि पदाधिकारी व सभासद उपस्थित होते.