(मुंबई / किशोर गावडे)
आमचे मुख्य नेते मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी आज लोकांमध्ये विश्वास निर्माण केला आहे. हे आपलं सरकार आहे. ज्या पक्षाची वाताहत झाली त्या पक्षाचे पदाधिकारी विरोधक खालच्या पातळीवर जाऊन सरकारवर टीका करत आहेत. मात्र मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, विरोधकांना विकासातून उत्तर द्या. विरोधकांना आपणही त्यांच्याच भाषेत उत्तर देऊ शकतो. मात्र, आपल्यावर राज्याच्या जनतेची जबाबदारी टाकली आहे. ती राज्याच्या सर्वांगीण विकासाची आहे. असे प्रतिपादन आमदार व शिवसेना सचिव डॉक्टर मनीषा कायंदे यांनी शनिवारी भांडुप येथे आयोजित केलेल्या मेळाव्यात केले.
शिवसेना भांडुप विधानसभा पदाधिकारी मार्गदर्शन मेळावा रामकली विद्यामंदिर भांडुप पश्चिम येथे शनिवारी २५ रोजी सायंकाळी ६ वाजता आयोजित करण्यात आला होता. मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. त्यावेळी डॉ. मनीषा कायंदे मार्गदर्शनपर बोलत होत्या.
यावेळी व्यासपीठावर , शिवसेना उपनेत्या संध्या वढावकर, ईशान्य मुंबई शिवसेना विभाग प्रमुख, माजी आमदार अशोक पाटील, ईशान्य मुंबई महिला विभाग प्रमुख राजश्री मांदविलकर, भायखळा विधानसभा उपविभाग प्रमुख देवेंद्र कदम, भांडुप विधानसभा प्रमुख व मेळाव्याचे आयोजक रमेश टक्के, भांडुप विधान सभेचे उपविभाग प्रमुख संजय दुडे, देवेंद्र जाधव, अंजली घाडीगावकर, दिपाश्री नाईक, नीलिमा साखरकर, आदी उपस्थित होते.
डॉ. मनीषा कायंदे आपल्या मार्गदर्शनपर भाषणात बोलताना म्हणाल्या, की कार्यकर्ते ही पक्षाची खरी ताकद आहे. संघर्ष केल्याशिवाय संघटनेला महत्त्व प्राप्त होत नाही. पक्षात काम करताना संघटन महत्त्वाचे आहे. त्यासाठी सर्वांना बरोबर घेऊन काम करावे. पक्षाची शिस्त प्रत्येक कार्यकर्त्यांनी पाळलीच पाहिजे. कार्यकर्त्यांनी लोकांची कामे केली तर पक्षावर त्यांचा विश्वास वाढेल. पक्षाची शिस्त पाळून संघटन करत राहा. आजच्या मेळाव्याला निमंत्रण देऊनही ज्यांनी जाणिवपूर्वक गैरहजर राहून बेशिस्तपणा केला आहे. त्यांची निश्चितच सखोल चौकशी केली जाईल. कुणाचीही गय केली जाणार नाही .पक्षाने शिस्तीला महत्त्व दिलेले आहे. हे सर्वांनी लक्षात ठेवावे.असे मत डॉ.मनिषा कायंदे यांनी व्यक्त केले.
शिवसेना पक्षाच्या वतीने ईशान्य मुंबईत चांगले काम करून कार्यकर्त्यांची फळी निर्माण करत आहेत. शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाचे संघटन मजबूत करण्यासाठी पदाधिकारी प्रयत्न करत असून, त्या माध्यमातून अनेक युवक पक्षाशी जोडले जात आहेत. वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली यापुढे आणखी चांगले काम करून पक्षाची ताकद दाखवून देण्याचा आपला प्रयत्न राहील, असे प्रतिपादन ईशान्य मुंबई शिवसेना विभाग प्रमुख अशोक पाटील यांनी सांगितले.
यावेळी शिवसेना उपनेत्या संध्या वढावकर, शिवसेना ईशान्य मुंबई विभाग प्रमुख राजश्री मांदविलकर, भायखळा विधानसभा उपविभाग प्रमुख देवा कदम यांनी आपल्या मनोगतात पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.
मेळाव्याचे प्रास्ताविक विधानसभा प्रमुख रमेश टक्के यांनी केले. या मेळाव्यास भांडुप विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी, शिवसैनिक व पुरुष व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.