(रत्नागिरी)
महिलेस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी चिपळूण पोलिस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये हणमंत गणपत पवार, शशिकांत श्रीरंग पवार, शशिकांत पवार (पुर्ण नाव माहिती नाही), रोशन पवार (रा. खातगुणता, खटाव जि. सातारा) अशी संशयितांची नावे आहेत.
ही घटना रविवारी (ता. १९) सायंकाळी सव्वाचारच्या सुमारास सातारा डायग्नोस्टिक सेंटर येथे घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे वडिल आजारी असल्याने त्यांची बहीण कविता हणमंत पवार (वय ४०, रा. मोरवणे, ता. चिपळूण) ही फिर्यादी यांच्याकडे राहाण्यासाठी आली. त्याचा राग धरुन संशयित हणमंत पवार यांनी बहिणीस फोन करुन वडिलांना माती दे आणि परत चिपळूणला ये मी तुला दाखवतो, अशी धमकी दिली. चिपळूणला कविता पवार गेल्या असता तिचा संशयितांनी मानसिक छळ केला अखेर तिने राहत्याघरी तणनाशक प्राशन करुन आत्महत्या केली.