(संगमेश्वर / प्रतिनिधी)
देवरुख हे कब्बडी स्पर्धेचे जसे माहेरघर आहे तसे ते कॅरम स्पर्धेचेही माहेरघर आहे. देवरुख शहरातून गुणी कॅरमपट्टू राष्ट्रीय अणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधून खेळले आहेत. ही बाब देवरुख शहरासाठी अभिमानास्पद आहे. शालेय व महाविद्यालय स्तरावर स्पर्धा प्रमाण काहीअंशी कमी झाल्याचे दिसून येत आहे. ही चिंतेची बाब असून शाळा व महाविद्यालय स्तरावरून गुणी खेळाडू घडत असतात, अशा खेळाडूंना पाठबळ देणे गरजेचे असते. अशा खेळाडूंना आपण नक्कीच पाठबळ देऊ, असे प्रतिपादन आमदार शेखर निकम यांनी शुक्रवारी ( दिनांक २४ नोव्हेंबर २०२३) देवरूख येथे बोलताना केले.
चिपळूण-संगमेश्वरचे लोकप्रिय आमदार शेखर निकम यांनी पुरस्कृत केलेल्या, रत्नागिरी जिल्हा कँरम असोसिएशन आयोजित व महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या मान्यतेने आमदार चषक राज्यस्तरीय कँरम स्पर्धेचे उद्घाटन शुक्रवारी सकाळी ११ वा. आमदार शेखर निकम यांच्याहस्ते झाले. यानंतर स्पर्धेला प्रारंभ झाला. ही स्पर्धा दि. २४ ते २६ नोव्हेंबर या कालावधीत देवरुख मराठा भवन येथे पार पडणार आहे. ही स्पर्धा पुरुष एकेरी व महिला एकेरी या गटात होणार आहे.
स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी महाराष्ट्र कँरम असोसिएशनचे सचिव अरुण केदार, उपाध्यक्ष यतीन ठाकूर, संंगमेश्वर तहसीलदार अमृता साबळे, गटविकास अधिकारी भरत चौगले, आयोजक रत्नागिरी जिल्हा कँरम असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप भाटकर, उपाध्यक्ष सुरेंद्र देसाई, सचिव मिलींद साप्ते, खजिनदार नितीन लिमये, जिल्हा क्रिडा अधिकारी विजय शिंदे, तालुका क्रिडा अधिकारी सचिन मांडवकर, शिवछञपती पुरस्कार विजेता आंतरराष्ट्रीय कँरमपट्टू संदिप देवरूखकर, रिआज अली अकबर, संंगमेश्वर तालुका बँडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष मंगेश प्रभुदेसाई, स्पर्धा प्रमुख मोहन हजारे, बाबा जाधव, बाबा दामुष्टे, योगेश मोहिरे, रवि शिंदे, राहूल भस्मे, दिलीप विंचू, दामोदर साळस्कर, बाबा बेंडके, बाळू ढवळे, हनिफ हरचिरकर, सुशील भायजे, निलेश कदम, सुचयअण्णा रेडीज, अनिकेत सुर्वे, पंकज पुसाळकर, नितीन भोसले, पंकज पुसाळकर, प्रफुल्ल भुवड, मंगेश बांडागळे, प्रफुल्ल बाईत, राम शिंदे, विकास राठोड, अमित बंडू जाधव, रामू पंदेरे, प्रदीप कांबळे, राजू वनकुंद्रे, रविंद्र लाड, ओमकार गायकवाड, जितेंद्र शेट्ये, दिनेश शिंदे, जयवंत पातेरे, बाळू वनकर, वसंत तावडे, प्रशांत कांबळे, प्रतिक जाधव उपस्थित होते.
तर स्पर्धेदरम्यान रत्नागिरी जिल्ह्यातील शिवछत्रपती पुरस्कार विजेते संदिप देवरुखकर व रियाज अकबर अली तसेच युवा कँरमपट्टू आकांक्षा कदम, निधी सप्रे, गुंजन खवळे, ओम पारकर, रोहन शिंदे, यश मोहिरे, द्रोण हजारे, राहुल भस्मे, अभिषेक चव्हाण यांचा आमदार शेखर निकम यांच्याहस्ते यथोचित सत्कार करण्यात आला.