(रत्नागिरी)
शहरातील फाटक हायस्कूलमधील शिक्षक संतोष भेलेकर यांना वसंत स्मृती आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरवण्यात आले. भारतीय जनता पार्टी, शिक्षक आघाडी कोकण विभाग यांच्यावतीने हा पुरस्कार वितरण कार्यक्रम ठाणे येथे आमदार निरंजन डावखरे व मान्यवरांच्या उपस्थितीत झाला.
स्पर्धा परीक्षा व शालेय परीक्षांचे मार्गदर्शन, गरजूंना आर्थिक मदत यासह इतर शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात केलेल्या कार्याबद्दल भेलेकर यांना सन्मानित करण्यात आले. दि न्यू एज्युकेशन संस्थेचे सर्व पदाधिकारी, मुख्याध्यापक राजन कीर, उपमुख्याध्यापक भास्कर झोरे, सचिव दिलीप भातडे, पर्यवेक्षक विश्वेश जोशी, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी भेलेकर यांचे अभिनंदन केले आहे.