(रत्नागिरी)
शहरातील झाडगाव येथे बेकायदेशिरपणे गावठी दारूची विक्री करणाऱ्या विरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई गुरुवार, १६ नोव्हेंबर रोजी दुपारी ११.४५ वा. करण्यात आली. परशुराम गिडप्पा कुटेकर (३१, रा. झाडगाव, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.
परशुराम हा त्याठिकाणी बेकायदेशिरपणे गावठी दारूची विक्री करत असल्याची गोपनीय माहिती शहर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, पोलिसांनी त्याठिकाणी धाड टाकून त्याच्याकडील अवैध दारू साठा जप्त केला. याप्रकरणी अधिक तपास शहर पोलिस करत आहेत