“आरोग्य धनसंपदा” असा आपल्या संस्कृतीमध्ये महत्वाचा विचार आहे. त्यालाच अनुसरुन खेडेगावातील जनसामान्यांपर्यंत उत्तम आरोग्यसेवा प्राप्त व्हावी या हेतूने डॉ. मिलिंद खेर, शिरगाव यांचा स्वतःचे मालकीचं भूधन (जमीन) कोणताही स्वार्थ न ठेवता वालावलकर रुग्णालय डेरवण यांना दान करण्याचा मानस आहे. भविष्यात वालावलकर हाॅस्पिटलच्या धरतीवर किंबहुना त्यांचेच एक युनिट संपूर्णपणे त्याठिकाणी होईल, व ते व्हावे यासाठीचा डॉ. खेर यांचा मानस/संकल्प आहे. त्यासाठी वालावलकर ट्रस्टच्या माध्यमातून तज्ञ डॉक्टरांमार्फत चाचपणी केली जाणार असून त्याकरिता विविध शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे.
त्याचाच एक भाग म्हणून रविवार दिनांक १९ नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी ११.०० ते दुपारी २.०० या वेळेतच शिरगाव येथे डॉक्टरांचे घरी वालावलकर रुग्णालय डेरवण यांचे विशेष तज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये विशेष तज्ञ डॉक्टरांकडून अस्थिरोग, नेत्र, बालरोग, स्त्रीरोग, त्वचारोग, जनरल फिजीशियन, कर्करोग, रक्तदाब, मधुमेह, इत्यादी तपासण्या केल्या जाणार आहेत. त्याशिवाय इसीजी काढला जाणार आहे.