(रत्नागिरी)
शिक्षक ध्येय आणि आगरकर विद्या भवन, हिंगणघाट, जिल्हा वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ‘ऑनलाइन चित्रकला स्पर्धा – २०२३’ साठी राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण चित्रकला स्पर्धेचे ‘ना नफा ना तोटा’ या तत्वावर आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना चित्र काढण्यासाठी प्रोत्साहन देणे, त्यांच्या कलेचे कौतुक करणे हाच या स्पर्धेमागील मुख्य उद्देश होता. राज्यातील विद्यार्थ्यांमधून तीन गटात ही ऑनलाइन चित्रकला स्पर्धा आयोजित केली होती.
अ गट (इयत्ता पहिली ते पाचवी) या गटामध्ये कुमार आराध्य योगेश नाचणकर याने उत्कृष्ट यश संपादन केले. कुमार आराध्य हा एस.पी.एम. इंग्लिश मीडियम स्कूल परशुराम चिपळूण या शाळेमध्ये शिकत असून या शाळेतील कलाशिक्षक, त्याचे वर्गशिक्षक येसादे तसेच विद्यालयाच्या मुख्याध्यापिका-मा. मांडवकर मॅडम यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभले. कुमार आराध्य याला चित्रकलेची लहानपणापासूनच आवड आहे. यापूर्वीही विविध स्पर्धांमधून त्याने यश संपादन केले आहे.त्याला दिल्या जाणाऱ्या पारितोषिकांमध्ये सन्मानचिन्ह (ट्रॉफी) आणि प्रिंट प्रशस्तीपत्र (सर्टिफिकेट) + शिक्षक ध्येयचे प्रिंट मासिके यांचा समावेश आहे.
त्याच्या या यशाबद्दल विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मांडवकर मॅडम तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक संस्थेचे अध्यक्ष व सर्व पदाधिकारी, यांनी त्याचे अभिनंदन केले आहे. व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.