(रत्नागिरी)
शहराजवळील नॅनोसिटी फेज येथील तरुणाने अज्ञात कारणातून पंख्याला नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
प्रसाद राजाराम पाचकले (वय २५, रा. नॅनोसिटी फेज २ फ्लॅट नं ३०१ मुळ : मानसकोंड, रत्नागिरी) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. सदर घटना बुधवारी (ता. १५) ) सकाळी सव्वाआठच्या सुमारास नॅनो सिटी फेज २ येथे घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रसाद घरी एकटाच होता. त्याने बेडरूमधील पंख्याला नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. उत्तरीय तपासणीसाठी त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते