( गणपतीपुळे/वैभव पवार )
महान गानसम्राज्ञी लता मंगेशकर उर्फ लतादीदी ह्या सन 1993- 94 मध्ये मालगुंडमध्ये आल्यानंतर त्यांनी क्रांतीकारी कवी केशवसुत यांच्या स्मारकाला भेट देऊन पाहणी केली होती. त्या भेटी प्रसंगी लतादीदींचे स्वागत करण्याची संधी मालगुंडच्या माजी प्राचार्या नलिनी खेर यांना प्राप्त झाली होती. यावेळी लतादीदींचे स्वागत करण्याचा क्षण आपल्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण ठरल्याची आठवण मालगुंडच्या माजी प्राचार्या नलिनी खेर यांनी ’24 न्यूज रत्नागिरी’ शी बोलताना व्यक्त केली.
लतादीदींच्या निधनानंतर त्यांच्या आठवणी सर्वच ठिकाणी जाग्या होत आहेत. गणपतीपुळे येथील मालगुंडनजीकच्या कविवर्य केशवसुत यांच्या जन्मभूमीतील त्यांच्या स्मारकाला लतादीदींनी 1993 मध्ये भेट दिल्यानंतर क्रांतिकारी कवी केशवसुतांचे स्मारक आणि तेथे अलौकिक लतादीदींच्या आवाजातील गाणे ऐकण्याची अभूतपूर्व योग अनुभवण्याची पर्वणी मालगुंडवासीयांना लाभली. 1993 मध्ये त्या गणपतीपुळे येथे श्रीं च्या दर्शनासाठी आल्या होत्या. या भेटीवेळी त्या गणपतीपुळे येथे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या ( एमटीडीसी) येथे राहिल्या होत्या. त्यानंतर त्यांनी मालगुंड येथे भेट दिल्यानंतर मालगुंड येथे भेट मोठी गर्दी झाली होती. यावेळी गर्दीतील कोणीतरी आम्हाला तुमचा थेट आवाज ऐकू दे, असा आग्रह लतादीदींकडे धरला होता. यावेळी लतादीदींनी ही कुठलेही आडमुठे न घेता आपल्या आवाजातील एक गाणे मालगुंडवासीयांना ऐकवले. यावेळी सर्वच मालगुंडवासीयांसाठी दीदींचा आवाज हृदयात जाऊन भिडला होता होता.
या भेटीत क्रांतिकारी कवी केशवसुत यांच्या अजरामर कविता पाहून दीदी खूप भारावून गेल्या. तसेच केशवसुतांचे आकर्षक स्वरूपातील स्मारक पाहून ही त्यांनी आनंद व्यक्त करीत खूपच समाधान मानल्याची अविस्मरणीय आठवण नलिनी खेर यांनी ’24 न्यूज रत्नागिरी’ शी बोलताना सांगितली.