( रत्नागिरी )
तालुक्यातील ग्रामपंचायत निवळी सरपंच तन्वी कोकजे यांच्या मार्गदर्शनाखाली ७ नोव्हेंबर २०२३ रोजी आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते. शिबिरात अनेकांनी तपासणी करून घेतली. यासोबत आधार अपडेट, PM किसान, कामगार कल्याण, सर्व सरकारी योजनांची माहिती देऊन योजनांचे फॉर्म भरून घेण्यात आले, तसेच अनेकांना आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड तयार करून देण्यात आले. एकूणच ग्रामपंचायतच्या माध्यमातून लोकांची विविध प्रकारची कामे करण्यात आली.
निवळी गावच्या सरपंच तन्वी कोकजे यांच्या नेतृत्वात नागरिकांसाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणे सुरु केले आहे. अशा उपक्रमाच्या माध्यमातून एकाच ठिकाणी नागरिकांच्या समस्या सुटण्यास मदत होत आहे. हा उपक्रम TWS आणि लायन्स क्लब तसेच जिल्हा शासकिय रूग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने यशस्वीपणे राबविण्यात आला. या उपक्रमासाठी सौ. श्वेता तोडकरी, सौ पुजा सुर्वे, सौ. सायली कोकजे, सो. वैशाली पावर श्री. विनायक रावणंग यांनी विशेष परिश्रम घेतले.