(खेड / भरत निकम)
जल फाऊंडेशन नोंदणीकृत संस्था कोकण विभागचे संस्थापकीय अध्यक्ष आणि खेड तालुक्याचे सुपूत्र नितीन सखाराम जाधव यांना घाटकोपर, मुंबई येथील श्री. विठ्ठल रुक्मिणी मंदिर चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थेकडून दिला जाणारा ‘समाज रत्न पुरस्कार २०२३’ प्रदान करण्यात आला.
भारतीय स्वातंत्र अमृत महोत्सव व श्री.संत ज्ञानेश्वर मोरे माऊली यांच्या सुवर्ण महोत्सव वर्षानिमित्त समाज कार्यासाठी समाजातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्था यांना पुरस्कार दिला जातो. सिद्धार्थ नगर, घाटकोपर येथे सद्गुरु दादा महाराज मोरे माऊली यांच्या हस्ते रात्री च्या कार्यक्रमात या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. या संस्थेचे अध्यक्ष विश्वनाथ सहदेव जाधव, उपाध्यक्ष सुधाकर सहदेव जाधव, सेक्रेटरी निवृत्ती विठोबा शिंदे, खजिनदार देवचंद्र चंद्रकांत मोरे यांच्यासह हजारो भाविक भक्त यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार वितरीत करण्यात आला.
फोटो : खेड तालुक्यातील किंजळे कळकरायवाडीचे सुपुत्र नितीन जाधव यांना समाज रत्न पुरस्कार देताना श्री. दादा महाराज मोरे माऊली.