(रत्नागिरी)
रत्नागिरी तालूक्यातील सैतवडे गावचे सुपुत्र राज्याचे उद्योगमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री नाम. उदयजी सामंत यांचे कट्टर समर्थक साजिद लियाकत शेकासन यांची पुढील अडीच वर्षासाठी सैतवडे सरपंच पदी बिनविरोध निवड करण्यात आहे.
उद्योजक साजिद शेकासन हे वाटद विभागात उद्योगमंत्री उदयजी सामंत, भैय्याशेठ सामंत, अण्णा सामंत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे शिंदे गटाचे सक्रीय कार्यकर्ते म्हणुन ओळखले जातात. जिल्हा प्रशासनातील तसेच तालुकास्तरावरील सर्व अधिकारी, कर्मचारी वर्गासोबत असलेले सलोख्याचे संबंध सैतवडे गावाच्या विकासासाठी उपयोगात येतील अशा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला.
सरपंच पदी नेमणुक झाल्यानंतर साजिद शेकासन यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, “गावातील सर्व घटकातील नागरिक, सदस्य सर्वांना सोबत घेउन गावाच्या विकासासाठी समर्पक काम करु.” सरपंच निवड प्रक्रीयेवेळी शिवसेना वाटद विभागप्रमुख योगेंद्र कल्याणकर, उपविभागप्रमुख अजिम चिकटे, माजी सरपंच सागर कदम, उपसरपंच सुवेश चव्हाम, आजी माजी ग्रामपंचायत सदस्य तसेच वाटद व सैतवडे जाकादेवी परिसरातील मान्यवर मंडळी उपस्थित होते