(राजापूर / तुषार पाचलकर)
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (आय )पक्षाचे पाचल -राजापूर सह संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात धडाडीने काम करणारे काँग्रेस (आय )चे जिल्हा सरचिटणीस आणि गेले 10 वर्ष पाचल गावचे माजी उपसरपंच पद भूषवणारे राजकारणापेक्षा समाजकारण करणारे पाचल गावचे किशोर नारकर यांची नुकतीच राजापूर तालुका काँग्रेस(आय) पक्षाच्या अध्यक्ष पदी नेमणूक करण्यात आली आहे. या नियुक्तीमुळे पाचलसह संपूर्ण राजापूर तालुक्यात आनंदाचं वातावरण निर्माण झाले आहे.
विधानसभेच्या माजी आमदार हुस्न बानु खलीपे मॅडम व नवी मुंबईचे माजी उपमहापौर तसेच भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष अविनाश लाड यांच्या शिफारशीनुसार काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी श्री किशोर नारकर यांची सामाजिक राजकीय कामगिरी, तसेच जिल्ह्यातील पक्षाचा दांडगा अनुभव पाहता नेमणूक करण्यात आल्याची माहीती जिल्हाध्यक्ष श्री अविनाश लाड यांनी यावेळी दिली.
किशोर नारकर यांनी पाचल गावचे 10 वर्ष उपसरपंच भूषवलं आहे. त्यामुळे पाचल परिसरात त्यांचा जनसंपर्क चांगला आहे. शिवाय ते परिसरातील पाचल पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ या शैक्षणिक संस्थेचे सहसचिव आहेत. पाचल गट विविध सह.सेवा संस्थेचे ते विद्यमान संचालक आहेत.
गेले 33 वर्ष विविध उपक्रम राबविणारी नेहरू युवा चैतन्य युवक मंडळ- पाचल या संस्थेचे ते सक्रिय कार्यकर्ते, राजापूर पूर्व भागात विविध उपक्रम राबवणारी पूर्वाई या संस्थेचे सचिव तसेच राजकारणा बरोबर सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे अशी ख्याती त्यांची तालुक्यात आहे. एकंदरीत येणाऱ्या निवडणूकित काँग्रेस पक्षाने या तालुक्यात जातीने लक्ष द्यायला सुरवात केल्याचे अप्रत्यक्ष संकेत या नियुक्तीमुळे दिसून आल्याची तसेच काँग्रेस पक्ष राजापूर तालुका लढवणार अशी राजकीय चर्चा तालुक्यात सुरु आहे.