(रत्नागिरी)
सहकर्जदाराला नोटीस काढल्याच्या रागातून बँक कर्मचाऱ्याची गाडी अडवून त्याला धमकी देत मारहाण केल्याचा प्रकार शुक्रवारी (३ नोव्हेंबर) रत्नागिरीत घडला. याप्रकरणी पोलिसांनी बँकेच्या कायदेशीर कामात अडथळा निर्माण केला. तसेच सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी युको बँकेचे रविकिरण बालासाहेब टेळे यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार अनंत गजानन शिंदे याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. रविकिरण टेळे हे ३ नोव्हेंबर रोजी दुपारी २:३० वाजता बँकेत काम करत असताना अनंत शिंदे आला. त्याने, ‘तुम्ही मला नोटीस का दिली, तुम्हाला अधिकार काय’, असे म्हणत शिवीगाळ केली. त्यानंतर तो निघून गेला. त्यानंतर सायंकाळी ६:४५ वाजता रविकिरण टेळे हे घरी जात असताना अनंत शिंदे याने त्यांच्या गाडीसमोर आपली गाडी आडवी लावली. त्यानंतर त्यांच्या कानफटात मारली. तसेच पुन्हा शिवीगाळ करून पुन्हा माझ्या वाटेल जाल तर लक्षात ठेवा, अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
बँकेच्या कायदेशीर कामात अडथळा निर्माण केला. तसेच सरका कामात अडथळा निर्माण करुन मारहाण केली आणि रस्त्यात गाडी अडवून धमकी दिल्याप्रकरण पोलिसांनी कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक तपास शहर पोलिस करत आहेत.