(कोलकाता)
भारतीय संघाचे वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील वर्चस्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले. भारतीय फलंदाज धावांचा पाऊस पाडत आहेतच, त्यात गोलंदाज विकेट्सची रांग लावून प्रतिस्पर्धींना हतबल करत आहेत. भारताने कोलकाताच्या ईडन गार्डनवर दक्षिण आफ्रिकेला स्वस्तात गुंडाळले. विराट कोहलीच्या विक्रमी शतकी खेळीनंतर रवींद्र जडेजाने पाच विकेट्स घेतल्या. युवराज सिंगनंतर वर्ल्ड कपमध्ये सामन्यात ५ विकेट्स घेणारा जडेजा दुसरा भारतीय फिरकीपटू ठरला.
विश्वचषक 2023 च्या 37 व्या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा 243 धावांनी पराभव केला आहे. कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारताने 326 धावा केल्या. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेचा संघ केवळ 83 धावा करू शकला आणि भारताने या स्पर्धेत अपराजित राहून आणखी एक सोपा विजय मिळवला.
भारताने दक्षिण आफ्रिकेचा 243 धावांनी पराभव केला आहे. यासह टीम इंडियाचा अजिंक्य राहण्याचा ट्रेंड कायम आहे. सलग आठ विजयांसह भारताने गुणतालिकेत अव्वल स्थान कायम राखले असून आता भारत अव्वल स्थानावर राहणार हेही निश्चित झाले आहे. त्याचवेळी दक्षिण आफ्रिकेला दुसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. मात्र, हा संघ यापूर्वीच उपांत्य फेरीत पोहोचला आहे, मात्र हा पराभव दक्षिण आफ्रिकेच्या मनोधैर्यासाठी अत्यंत घातक ठरणार आहे.
वन-डे वर्ल्डकप स्पर्धेमध्ये द. आफ्रिकाविरूद्धच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना विराट कोहलीने खास विक्रम आपल्या नावावर केला आहे. त्याने भारताचा माजी दिग्गज फलंदाज सचिन तेंडूलकरच्या विक्रमाशी बरोबरी केली. सचिनने वन-डे क्रिकेटमध्ये 463 सामन्यांमध्ये 453 इनिंग खेळत 49 शतक झळकावली आहेत. विराट कोहलीने 289 सामन्यात 277 इनिंगमध्ये 49 झळकवत सचिनच्या विक्रमाशी बरोबरी केली आहेत. विराटने वन-डेमध्ये सर्वाधिक शतके श्रीलंकाविरूद्ध झळकावली आहेत. त्याने आत्तापर्यंत श्रीलंका संघाविरूद्ध सर्वाधिक 10 शतके झळकावली आहेत.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने 50 षटकांत 5 गडी गमावून 326 धावा करत दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी 327 धावांचे आव्हान ठेवलं होतं. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेचा संघ केवळ 83 धावा करू शकला. मार्को जॅन्सनने सर्वाधिक 14 धावा केल्या. त्याच्याशिवाय डुसेनने 13 आणि बावुमा-मिलरने प्रत्येकी 11-11 धावा केल्या. याशिवाय आफ्रिकेच्या एकाही फलंदाजाला दुहेरी आकडा पार करता आला नाही. भारताकडून रवींद्र जडेजाने सर्वाधिक पाच विकेट घेतल्या. मोहम्मद शमी आणि कुलदीप यादव यांना प्रत्येकी दोन बळी मिळाले. मोहम्मद सिराजने एक विकेट घेतली.
तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने 50 षटकांत 5 गडी गमावून 326 धावा केल्या. विराट कोहली 121 चेंडूत 101 धावा केल्यानंतर नाबाद राहिला. त्याचवेळी, रवींद्र जडेजा 15 चेंडूत 29 धावा करून नाबाद राहिला. टीम इंडियाची सुरुवात चांगली झाली होती. रोहित शर्माने शुभमन गिलसह 35 चेंडूत 62 धावांची भागीदारी केली. रोहित 24 चेंडूत 40 धावा करून बाद झाला. त्याने आपल्या खेळीत सहा चौकार आणि दोन षटकार मारले. शुभमन गिल 24 चेंडूत 23 धावा करून बाद झाला. आपल्या खेळीत त्याने चार चौकार आणि एक षटकार लगावला.
93 धावांवर दोन विकेट पडल्यानंतर विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांनी 134 धावांची भागीदारी केली. श्रेयस 87 चेंडूंत सात चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 77 धावा करून बाद झाला. केएल राहुल काही विशेष करू शकला नाही आणि त्याला केवळ आठ धावा करता आल्या. सूर्यकुमार यादवने 14 चेंडूंत पाच चौकारांच्या मदतीने जलद 22 धावा केल्या. विराटने 49 व्या षटकात आपले शतक पूर्ण केले. 121 चेंडूत 10 चौकारांच्या मदतीने 101 धावा केल्यानंतर तो नाबाद राहिला. विराटचे हे 49 वे शतक होते. त्याने सचिन तेंडुलकरच्या 49 वनडे शतकांच्या विक्रमाशी बरोबरी केली. त्याचवेळी जडेजाने 29 धावांच्या नाबाद खेळीत तीन चौकार आणि एक षटकार ठोकला. दक्षिण आफ्रिकेकडून लुंगी एनगिडी, मार्को जॅनसेन, कागिसो रबाडा, केशव महाराज आणि तबरेझ शम्सी यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
विराट कोहलीने 119 चेंडूत शतक झळकावले. हे त्याचे एकदिवसीय कारकिर्दीतील 49 वे शतक होते. या बाबतीत त्याने महान फलंदाज आणि क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरची बरोबरी केली. सचिनने वनडेमध्ये 49 शतके झळकावली आहेत. सचिनने 452 एकदिवसीय डावात ही कामगिरी केली होती, तर विराटने 277 व्या एकदिवसीय डावात 49 शतके झळकावली आहेत. यात विशेष म्हणजे आज वाढदिवसाच्या दिवशी त्याने शतक झळकावून विक्रमाची बरोबरी केली. या विश्वचषकातील त्याचे हे दुसरे शतक ठरले.