(पुणे)
पुण्यातील विश्वचषकाच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने न्यूझीलंडचा तब्बल १९० धावांनी दारुण पराभव केला. आफ्रिकेने दिलेल्या ३५७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना किवी फलंदाजांची दमछाक उडाली. न्यूझीलंडचा संपूर्ण डाव ३५.३ षटकात १६७ धावांत संपुष्टात आला. न्यूझीलंडकडून ग्लेन फिलिप्स याने एकाकी झुंज दिली. त्याने ५० चेंडूत ६० धावांची खेळी केली. फिलिप्सचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला लौकिकास साजेशी खेळी करता आली नाही.
विश्वचषकातील 32 व्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने न्यूझीलंडचा 190 धावांनी पराभव करत मोठा विजय मिळवला. दोन्ही संघांमधील हा सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर झाला. दक्षिण आफ्रिकेनं विश्वचषकात सहावा विजय नोंदवला. या विजयासह आफ्रिकेचा संघ गुणतालिकेत पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. आता त्याचे 12 गुण झाले आहेत.
दुसरीकडे न्यूझीलंडला एक स्थान गमवावे लागले. तो तिसऱ्या स्थानावरून चौथ्या स्थानावर गेला. सात सामन्यांमधला त्याचा हा तिसरा पराभव आहे. त्याच्या खात्यात आठ गुण आहेत. विश्वचषकाची उपांत्य फेरी गाठण्यासाठी उर्वरित दोन्ही सामने जिंकावे लागतील. एक सामना जिंकल्यास इतर संघांच्या निकालावर अवलंबून राहावे लागेल. न्यूझीलंड संघ 4 नोव्हेंबरला पाकिस्तान आणि 9 नोव्हेंबरला श्रीलंकेविरुद्ध खेळणार आहे. दुसरीकडे, दक्षिण आफ्रिकेला भारत (5 नोव्हेंबर) आणि अफगाणिस्तान (10 नोव्हेंबर) विरुद्ध शेवटचे दोन सामने खेळायचे आहेत.
न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लॅथमने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दक्षिण आफ्रिकेने 50 षटकांत चार विकेट गमावत 357 धावा केल्या. प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा संघ 35.3 षटकांत सर्वबाद 167 धावांवर आटोपला. त्यांचे तीनच फलंदाज दुहेरी आकडा गाठू शकले. ग्लेन फिलिप्सने 50 चेंडूत 60 धावा केल्या. विल यंगने 33 आणि डॅरिल मिशेलने 24 धावा केल्या रचिन रवींद्र आणि ट्रेंट बोल्टने प्रत्येकी नऊ धावा, मिचेल सँटनर आणि टीम साऊदीने प्रत्येकी सात धावा, टॉम लॅथमने चार आणि डेव्हन कॉनवेने दोन धावा केल्या. जेम्स नीशम शून्यावर बाद झाला. मॅट हेन्री खाते न उघडता नाबाद राहिला.
दक्षिण आफ्रिकेकडून केशव महाराज आणि मार्को जॅनसेन यांनी शानदार गोलंदाजी केली. केशव महाराज याने नऊ षटकांत 46 धावा देत चार बळी घेतले. मार्को यानसेनने आठ षटकांत 31 धावांत तीन बळी घेतले. गेराल्ड कोएत्झीने दोन आणि कागिसो रबाडाला एक विकेट मिळाली.
तत्पूर्वी, दक्षिण आफ्रिकेने 50 षटकांत चार गडी गमावून 357 धावा केल्या. आफ्रिकन संघाकडून सलामीवीर क्विंटन डी कॉक आणि हेनरिक क्लासेन यांनी शतकी खेळी खेळली. ड्युसेनने 118 चेंडूत 133 धावा केल्या. डी कॉकने 116 चेंडूत 114 धावांची खेळी खेळली. ड्युसेनने आपल्या खेळीत नऊ चौकार आणि पाच षटकार मारले. तर डी कॉकने 10 चौकार आणि तीन षटकार ठोकले.
डेव्हिड मिलरने 30 चेंडूत 53 धावा केल्या. त्याने दोन चौकार आणि चार षटकार मारले. कर्णधार टेंबा बावुमाने 24 धावा केल्या. हेन्रिक क्लासेन सात चेंडूत 15 धावा करून नाबाद राहिला आणि एडन मार्कराम एका चेंडूवर सहा धावा करून नाबाद राहिला. न्यूझीलंडकडून गोलंदाजीत टीम साऊदीने 10 षटकात 77 धावा देताना दोन विकेट घेतल्या. तर ट्रेंट बोल्ट आणि जेम्स नीशम यांना प्रत्येकी एक यश मिळाले. बोल्ट यानं 10 षटकात 49 तर जेम्स नीशम यानं 5.3 षटकात 69 धावा दिल्या.
डेवेन कॉनवे २, विल यंग ३३, रचिन रविंद्र ९, डॅरेल मिचेल २४, टॉम लेथम ४, मिचेल शँटनर ७, टीम साऊदी ७, जीमी नीशम ० यांना मोठी खेळी करता आली नाही. या फलंदाजांनी सपशेल लोटांगण घेतले. दक्षिण आफ्रिकेकडून केशव महाराज याने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. मार्को यानसन याने ३ विकेट घेतल्या. त्याशिवाय गेराल्ड कोटजी याने दोन विकेट घेतल्या. तर रबाडाला एक विकेट मिळाली.