(राजापूर)
रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या वतीने राबविण्यात आलेल्या अभिनव उपक्रमातून राजापूर तालुक्यातून निवड झालेल्या सहा पैकी तीन विद्यार्थ्यांची नासा व इस्त्रो या अतंराळ संशोधन संस्थेस भेट देण्याची व तीन विद्यार्थ्यांची इस्त्रो भेटीसाठी निवड झाली आहे.
विज्ञानाविषयी आवड निर्माण होण्यासाठी रत्नागिरी जिल्हा परिषदेकडून जि. प. शाळेतील विद्यार्थ्यांसाठी हा अनोखा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या करिता तालुका स्तरावर निवड स्पर्धा घेण्यात आली. त्यातून राजापूर तालुक्यातून सहा विद्यार्थी या नासा व इस्त्रो भेटीसाठी पात्र ठरले.
त्यामध्ये शहरातील जि. प. गुजराळी शाळेतील इयत्ता सातवीतील विद्यार्थीनी कु. शर्वरी सुघोष काळे, जि. प. शाळा खरवते नं. १ ची विद्यार्थीनी जस्लिन फैयाज हाजू आणि जि. प. शाळा कोतापूर नं. १ शाळेची विद्यार्थीनी शमिका संतोष शेवडे यांची आंतरराष्ट्रीय अवकाश संशोधन संस्था नासा व राष्ट्रीय अंतराळ संशोधन संस्था इस्त्रो भेटीसाठी निवड झाली आहे.