(लखनौ)
एकदिवसीय विश्वचषकाच्या 29व्या सामन्यात महंमद शमी, जसप्रीत बुमराह व कुलदीप यादव यांच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारताने गतविजेत्या इंग्लंडचा 100 धावांनी पराभव केला. लखनौच्या एकना स्टेडियमवर इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने 50 षटकांत नऊ गडी गमावून 229 धावा केल्या. प्रत्युत्तरात इंग्लंडचा डाव 34.5 षटकांत 129 धावांत गारद झाला. रोहित शर्मा सामन्याचा मानकरी ठरला.
जसप्रित बुमराहने सलग दोन चेंडूवर इंग्लंडला हादरे दिल्यानंतर इंग्लंडचा डाव शेवटपर्यंत सावरलाच नाही. मोहम्मद शमीने सलग दुस-या सामन्यात घातक मारा करत ४ विकेट घेतल्या आणि साहेबांना घरचा रस्ता दाखविण्यात मोलाची भूमिका बजावली. या दोघांच्या भेदक गोलंदाजीला कुलदीप आणि रविंद्र्र जडेजाची सुद्धा दमदार साथ मिळाली. शमीने चारपैकी ३ क्लीनबोल्ड विकेट घेत इंग्लंडची दाणादाण उडवली. बुमराहने ३ गडी बाद केले.
टीम इंडियाने या स्पर्धेत सलग सहावा विजय मिळवला. यासह गुणतालिकेत 12 गुणांसह अव्वलस्थानही प्राप्त केले आहे. त्याचबरोबर इंग्लंडचा सहा सामन्यांमधला हा पाचवा पराभव आहे. त्यांचा संघ 2 गुणांसह शेवटच्या स्थानी आहे. भारतीय संघ आता उपांत्य फेरी गाठण्याच्या जवळ आहे. त्याचवेळी इंग्लंडचा संघ स्पर्धेतून बाहेर होण्याच्या मार्गावर आहे. 20 वर्षांतील विश्वचषकात भारताचा इंग्लंडवर पहिला विजय आहे. त्यांचा शेवटचा विजय 2003 मध्ये झाला होता. त्यानंतर 2011 मध्ये दोन्ही संघांमधील सामना बरोबरीत सुटला होता. त्याचवेळी 2019 मध्ये टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला होता.
इंग्लंडचे तीन फलंदाज शून्यावर माघारी…
भारताने विजयासाठी दिलेल्या 203 धावाचा पाठलाग करताना इंग्लंडचा डाव 34.5 षटकांत 129 धावांत गारद झाला. भारतीय गोलंदाजांनी सातत्याने विकेट घेत इंग्लंडला दडपणाखाली ठेवले. जो रूट आणि बेन स्टोक्स या दिग्गजांशिवाय मार्क वुडलाही खाते उघडता आले नाही. इंग्लंडसाठी लियाम लिव्हिंगस्टोन हा एकमेव फलंदाज होता ज्याने 20 धावांचा टप्पा ओलांडला. त्याने सर्वाधिक 27 धावा केल्या. डेव्हिड मलानने 16, डेव्हिड विलीने नाबाद 16, मोईन अलीने 15, जॉनी बेअरस्टोने 14, आदिल रशीदने 13, जोस बटलर आणि ख्रिस वोक्सने 10-10 धावा केल्या.
भारताच्या गोलंदाजांनी चमकदार कामगिरी करत इंग्लंडच्या फलंदाजांना टिकू दिले नाही. न्यूझीलंडविरुद्ध पाच विकेट घेणाऱ्या मोहम्मद शमीने या सामन्यातही घातक गोलंदाजी करत चार विकेट्स आपल्या नावावर केल्या. अनुभवी जसप्रीत बुमराहने तीन बळी घेतले. कुलदीप यादवला दोन आणि रवींद्र जडेजाला एक यश मिळाले.
तत्पूर्वी, भारताविरुद्धच्या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंंतर प्रथम फलंदाजी टीम इंडियाने 50 षटकांत नऊ विकेट गमावून 229 धावा केल्या. भारतीय संघ असा एकमेव संघ आहे जो या विश्वचषकात आतापर्यंत ऑलआऊट झालेला नाही. भारताकडून रोहित शर्माने कर्णधारपदाची खेळी खेळली आणि रोहितनं सर्वाधिक 87 धावा केल्या. तर सूर्यकुमार यादवने 49 आणि राहुलने 39 धावांची खेळी केली. इंग्लंडकडून डेव्हिड विलीने सर्वाधिक तीन बळी घेतले. त्याचवेळी ख्रिस वोक्स आणि आदिल रशीद यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. मार्क वुडला एक विकेट मिळाली.
भारताचा डाव…
भारताला चौथ्या षटकात 26 धावांवर पहिला धक्का बसला. इनस्विंग बॉलवर ख्रिस वोक्सने शुभमन गिलला क्लीन बोल्ड केले. शुभमनला 13 चेंडूत 9 धावा करता आल्या. त्यानंतर लगेचच 27 च्या स्कोअरवर डेव्हिड विलीने टीम इंडियाला दुसरा धक्का बसला आहे. विराट कोहली खाते न उघडताच पॅव्हेलियनमध्ये परतला. कोहली आठ चेंडूत खाते उघडू शकला नाही आणि दबावाखाली दिसत होता. डेव्हिड विलीच्या गोलंदाजीवर अन् नवव्या चेंडूवर शॉट मारण्याचा प्रयत्नात विराट स्टोक्सला झेल देऊन बसला.
12व्या षटकात 40 धावांवर भारताला तिसरा धक्का बसला. श्रेयस अय्यर 16 चेंडूत चार धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. श्रेयसला मार्क वूडने ख्रिस वोक्सकरवी झेलबाद केले. शॉर्ट बॉलवर श्रेयस पुन्हा एकदा बाद झाला. ही त्याची कमजोरी आहे आणि विश्वचषत स्पर्धेत तो या चेंडूवर अनेक वेळा बाद झाला आहे. न्यूझीलंडविरुद्धही तो शॉर्ट बॉलवर बाद झाला होता. शॉर्ट बॉल मारण्याचा प्रयत्नात श्रेयस विकेट गमावून बसला. भारतानं चौथी विकेट 131 धावांवर गमावली. लोकेश राहुल 58 चेंडूत 39 धावा करून बाद झाला. डेव्हिड विलीने त्याला जॉनी बेअरस्टोकरवी झेलबाद केले. रोहित आणि राहुल यांच्यात चौथ्या विकेटसाठी 91 धावांची भागिदारी झाली.
भारताला 37व्या षटकात 164 धावांवर पाचवा धक्का बसला. कर्णधार रोहित शर्मा 101 चेंडूत 10 चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने 87 धावा करून बाद झाला. त्याला आदिल रशीदने लिव्हिंगस्टोनच्या हाती झेलबाद केले. रोहितने सूर्यकुमारसोबत पाचव्या विकेटसाठी 33 धावांची भागीदारी केली. भारताला 41व्या षटकात 182 धावांवर सहावा धक्का बसला. आदिल रशीदने रवींद्र जडेजाला पायचीत (एलबीडब्ल्यू आऊट) केले. त्याला 13 चेंडूत आठ धावा करता आल्या. त्यानंतर लगेगच म्हणजे भारताला 183 धावांवर सातवा धक्का बसला. मार्क वुडने मोहम्मद शमीला जोस बटलरवी झेलबाद केले. त्याला एक धाव करता आली.
Captain Rohit Sharma led from the front with a spectacular 87(101) as he receives the Player of the Match award 🏆#TeamIndia register a 100-run win over England in Lucknow 👏👏
Scorecard ▶️ https://t.co/etXYwuCQKP#CWC23 | #MenInBlue | #INDvENG pic.twitter.com/VnielCg1tj
— BCCI (@BCCI) October 29, 2023
भारताला 47व्या षटकात 208 धावांवर आठवा धक्का बसला. सूर्यकुमार यादवचे अर्धशतक हुकले. तो 47 चेंडूंत 4 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 49 धावा करून बाद झाला. त्याला डेव्हिड विलीने ख्रिस वोक्सच्या हाती झेलबाद केले. त्याचवेळी जसप्रीत बुमराह आणि कुलदीप यादव यांनी नवव्या विकेटसाठी 21 धावांची भागीदारी करत भारतीय संघाची धावसंख्या 229 पर्यंत नेली . शेवटच्या चेंडूवर बुमराह धावबाद झाला. त्याला 25 चेंडूत 16 धावा करता आल्या. कुलदीप नऊ धावा करून नाबाद राहिला.
Undefeated India go to the top of the #CWC23 points table with their sixth successive win in the tournament 👊#INDvENG 📝: https://t.co/sLTTWYaH8H pic.twitter.com/ZqjSAJ7NBL
— ICC (@ICC) October 29, 2023