मराठा आंदोलक मंगेश साबळे यांच्यासह काही तरुणांनी गुरुवारी वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीच्या काचा फोडल्या आहेत. या प्रकरणी पोलिसांनीगुन्हा दाखल करत मंगेश साबळे यांच्यासह तीन जणांना अटक केली. पोलिसांनी मंगेश साबळे, वसंत बनसोडे, राजू सावे या आरोपींना ताब्यात घेतलं. न्यायालयानं पाच हजारांच्या जातमुचलक्यावर त्यांची जामीनावर सुटका केली. याप्रकरणी जामीन मिळाल्यानंतर मंगेश साबळे यांनी गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीच्या काचा फोडण्याचं कारणही सांगितलं आहे.
सदावर्ते मराठा आंदोलनाचा वारंवार अपमान करत असल्यामुळे तसेच मराठ्यांना माजोरडा म्हणत असल्यानं त्यांच्या गाड्यांची तोडफोड केल्याचं मंगेश साबळे यांनी म्हटलं आहे. साबळे म्हणाले की, मराठा आरक्षणासाठी मराठा समाज शांततेत आंदोलन करत आहे. या आंदोलनाला गालबोट लावण्याचा आमचा प्रयत्न नाही. पण मराठा समाज माजोरडा आहे, मराठा समाजाला मी आरक्षण मिळूच देणार नाही, मराठा समाजाची सभा ही जत्रा आहे असं, सातत्याने बोलून आमच्या भावना दुखावण्याचं काम गुणरत्न सदावर्ते करत आहेत. याला थेट चाप लावण्याचं काम आम्ही केलंय. आमच्याकडून कायदा मोडला गेला असेल तरी लाखो करोडो मराठ्यांच्या अस्मितेचा हा प्रश्न आहे. लाखो-करोडो मराठांच्या मानसन्मानाचा हा प्रश्न आहे असं मंगेश साबळे यांनी म्हटलंय.
छत्रपतींच्या मराठ्यांना माजोरडा म्हणणं हे सदावर्तेंना महागात पडते हे दाखवून देण्यासाठी हा प्रकार घडलेला आहे.
#WATCH | Maharashtra | Vehicles of advocate Gunaratna Sadavarte found vandalised outside his residence in Mumbai. He is a lawyer against the Maratha Reservation in Maharashtra. Police are investigating the matter. pic.twitter.com/2cTjhnDBOt
— ANI (@ANI) October 26, 2023