(कतार)
भारताच्या आठ माजी नौसैनिकांना कतारमधील न्यायालयाने मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. इस्रायलसाठी हेरगिरी केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. कॅप्टन नवतेज गिल, कॅप्टन बिरेंद्रकुमार वर्मा, कॅप्टन सौरभ वशिष्ठ, कमांडर अमित नागपाल, कमांडर पूर्णेंदू तिवारी, कमांडर सुगुनाकर पकाला, कमांडर संजीव गुप्ता आणि नाविक रागेश अशी यांची नावे आहेत. या सर्वांना हेरगिरीच्या आरोपाखाली चौकशीसाठी त्यांच्या स्थानिक निवासस्थानातून अटक करण्यात आली होती.
या आठही Indian marines माजी अधिकार्यांचे जामीन अर्ज फेटाळण्यात आले. कतारच्या अधिकार्यांनी त्यांच्या कोठडीत वाढ केली होती. अशातच गुरुवारी कतारच्या न्यायालयाने त्यांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावली. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने या प्रकरणावर आश्चर्य व्यक्त केले असून, पुढील प्रकि‘येला सामोरे जाणार असल्याचे स्पष्ट केले. आम्हाला फाशीच्या शिक्षेच्या निर्णयामुळे धक्का बसला आहे आणि आम्ही सविस्तर निकालाची वाट पाहत आहोत, असे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले. मागील वर्षी सप्टेंबर महिन्यांत अटकेची कारवाई करण्यात आली होती.
या प्रकरणी Indian marines भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने एक निवेदन जारी करून म्हटले की, आम्ही सर्व आठ अधिकार्यांच्या कुटुंबातील सदस्य आणि विधि पथकाच्या संपर्कात आहोत. सर्व कायदेशीर बाबींचा अभ्यास सुरू असून कतारच्या अधिकार्यांकडे हा निर्णय मांडणार आहोत. सर्व वकिलांना कायदेशीर साहाय्य प्रदान करणे सुरू ठेवले जाईल. हे अधिकारी अलिकडच्या काळात दहरा ग्लोबल टेक्नॉलॉजीज आणि कन्सल्टन्सी सर्व्हिसेससाठी कार्यरत होते. ही एक खाजगी कंपनी आहे, जी कतारच्या सशस्त्र दलांना प्रशिक्षण आणि संबंधित सेवा पुरवते.